Maharashtra Politics News | ‘…तर त्यांना त्यांची किंमत कळेल’, गुवाहटीवरुन आलेल्या आमदाराची फडणवीसांवर बोचरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच एका भाषणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचा उल्लेख ‘शिल्लकसेना’ असा केला होता. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरुन (Maharashtra Politics News) ठाकरे गटाचे नेते आणि गुवाहटीवरुन परत आलेले आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी बोचरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्वत:चा पक्ष आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) नाव बाजूला केलं, तर त्यांना त्यांची किंमत कळेल, अशी टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर प्रसारमाध्यमांनी नितीन देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना शिल्लकसेना म्हणतात, उद्धव ठाकरे यांच्याजवळ पक्ष आणि चिन्ह नाही, असं म्हणतात. (Maharashtra Politics News) मात्र आता फडणवीस आत्मचिंतन करत आहेत. त्यांना माहित आहे की, पक्ष आणि चिन्ह नसताना उद्धव ठाकरेंच्या सभेला लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत. महाराष्ट्रातील जनता ठाकरेंच्या पाठिशी आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचं नाव आणि नरेंद्र मोदी यांचं नाव बाजूला करुन महाराष्ट्रात फिरावं, त्यांच्या सभेला
दहा लोकही येणार नाहीत. ते पक्षाचं नाव बाजुला करुन महाराष्ट्र फिरले तर व्यक्ती म्हणून त्यांना किती किंमत आहे?
हे समजेल. उद्धव ठाकरेंना शिल्लकसेना म्हणण्यापेक्षा तुमचं वैयक्तिक अस्तित्व काय आहे? ते आधी बघा,
असा टोला नितीन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

देशमुख पुढे म्हणाले, तुम्ही पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडून जबरदस्तीने काढून घेतलं.
तरीही त्यांच्या सभेला मोठी गर्दी होते. तुम्ही पक्षाचं नाव बाजुला करुन सभा घेतली तर तुमच्या सभेला दहा लोकही
जमा होणार नाहीत, अशी परिस्थिती तुमची आज महाराष्ट्रात आहे. तुम्हाला उद्धव ठाकरेच सगळीकडे दिसत आहेत.
तुमच्या मनात भीती निर्माण झाली आहे, म्हणून वारंवार तुम्ही उद्धव ठाकरेंचे नाव घेत आहात.

Web Title :  Maharashtra Politics News mla nitin deshmukh reaction on devendra fadnavis statement on uddhav thackeray and shillaksena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 50 लाखाच्या खंडणी प्रकरणी चौघांना अटक ! कंपनी चालकाकडे Whatsapp Call करून केली होती ‘डिमांड’

पुन्हा नोटबंदी ! 2 हजाराची नोट बंद होणार, ‘या’ तारखेपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

RBI To Withdraw Rs 2000 Currency Note From Circulation | आरबीआयचा मोठा निर्णय ! 2000 च्या नोटा चलनातून बंद होणार, पण 30 सप्टेंबरपर्यंत राहणार वैध; जाणून घ्या नोटा कधी बदलता येणार अन् एका वेळी किती नोटा बदलता येणार?