Maharashtra Politics News | जावळीत राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंना धक्का, ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | जावळी तालुक्याचे नेते आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (NCP MLA Shashikant Shinde) यांना मोठा धक्का बसला आहे. शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे (Rishikant Shinde) यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश (Join Shiv Sena) केला. या प्रवेशामुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेत प्रवेश कल्याचे ऋषिकांत शिंदे यांनी प्रवेशानंतर खुलासा केला. (Maharashtra Politics News)

शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाजप (BJP) आणि शिवसेना हे आपले विरोधक आहेत, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता त्यांचे बंधूच विरोधकांच्या गटात सामील झाल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. ऋषिकांत शिंदे यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठ धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आता शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जावळी तालुक्याचे लक्ष लागले आहे. ऋषिकांत शिंदे हे आमदार शशिकांत शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. (Maharashtra Politics News)

 

शिवसेना प्रवेशानंतर बोलताना ऋषिकांत शिंदे म्हणाले,
मी जिल्हा परिषद कुडाळ (Zilla Parishad Kudal) गटामध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभा होतो.
मात्र, पक्षांतर्गत गद्दारीमुळे व कुरघोड्याचे राजकारणामुळे पराभव केला.
जिल्हा परिषद कुडाळ गटात राष्ट्रवादीच्या तिकीटावर माझा पराभव झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला गेला नाही. जनतेला न्याय दिला गेला नाही. मुंबईत अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी माथाडी कामगारांना खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नासाठी मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ऋषिकांत शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title :  Maharashtra Politics News | mla shashikant shindes brother rushikant shinde joins shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा