Maharashtra Politics News | कर्नाटकातील विजयानंतर मनसेकडून काँग्रेसचे अभिनंदन, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसने (Congress) भाजपचा (BJP) दारुण पराभव केला. काँग्रेसच्या विजयानंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार (MNS Leader Yashwant Killedar) यांनी पत्र लिहून पक्षाचे अभिनंदन केले आहे. हे पत्र किल्लेदार यांनी सोशल मीडियावर शेअर करताना कर्नाटकच्या विजयासाठी काँग्रसेचे अभिनंदन आणि जनमताचा कौल झुगारुन घोडेबाजार करणाऱ्यांसाठी बोध, अशी टिप्पणी केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा (Maharashtra Politics News) चिखल करणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा हात असल्याचा गंभीर आरोप किल्लेदार यांनी पत्रातून केला आहे.

मनसे कडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात तर भाजपसाठी पूरक भूमिका घेत असताना किल्लेदार यांनी लिहिलेल्या पत्रामुळे आणि फडणवीस यांना टार्गेट केल्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किल्लेदार यांनी पत्रात म्हटले की, कर्नाटकात 2018 साली झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नव्हते. मात्र काँग्रेस आणि जेडीएसने युती (Congress-JDS Alliance) करुन बसवलेलं सरकार भाजपने 2019 मध्ये ऑपरेशन ‘ब्लू लोटस’ (Operation Blue Lotus) राबवत पाडलं, आणि स्वत:च सरकार बसवलं. पण तिथल्या जनतेला हा घोडेबाजार लक्षात राहिला आणि जनतेने भाजपला चांगलाच धडा शिकवला.

आज कर्नाटक निवडणुकांचे हाती आलेले कल पाहता, भाजपच्या विरुद्ध जनतेच्या मनात रोष दिसून येत आहे. भाजपने खेळलेल्या अशा फोडा-फोडीच्या खेळीमुळे त्यांच्या मतदार संख्येतही घट दिसून येत आहे. महाराष्ट्रातही 2019 ला झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला (Shiv Sena-BJP Alliance) कौल दिला होता. मात्र त्यांच्या अंतर्गत वादामुळे आधी राष्ट्रवादी-भाजपा त्यानंतर महाविकास आघाडी आणि आता पुन्हा भाजपच्या घोडेबाजारामुळे भाजप शिवसेना (शिंदे गट-Shinde Group) हे सरकार उदयास आले.

https://www.facebook.com/photo/?fbid=275350184839114&set=a.174210138286453

प्रस्थापित राजकारण्यांचा जनतेच्या मनात विरोधात चाललेला हा राजकारणाचा खेळ जनता पाहत आहे. येणाऱ्या काळात आगामी निवडणुकांमध्ये कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातील ही जनता राजकारणाचा आणि जनतेच्या मनात खेळ करणाऱ्या राजकारण्यांना आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडीमध्ये हात असलेल्या
देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कूटनीती महाराष्ट्र पाहत आहे.
लवकरच जनतेची काठी चालेल आणि कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्राची जनता ह्या निगरगट्ट राजकारण्यांना
धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असे शिलेदार यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title :-   Maharashtra Politics News | mumbai mns leader yashwant killedar congress for karnataka election results slams devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

Pune Crime News | खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरलेल्या 9 पैकी 2 मुलींचा बुडून मृत्यु; बुलढाणा जिल्ह्यातील मुली