Maharashtra Politics News |  ‘एकनाथ शिंदे गारुडी तर देवेंद्र फडणवीस…’, सापनाथ-नागनाथ टीकेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News |  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी नुकतीच ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Maan) हे उपस्थित होते. या भेटीवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली होती. कितीही सापनाथ-नागनाथ एकत्र आले तरी मोदींना (Maharashtra Politics News) पराभूत करु शकत नाहीत. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

मुख्यमंत्री गारुडी तर फडणवीस…

नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गारुडी आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तज्ज्ञ आहेत. (Maharashtra Politics News) दुसऱ्यांना नागनाथ आणि सापनाथ म्हणणं याचा परिणाम काय होतो, हे उत्तर प्रदेशात पाहिलं आहे. तसेच, आता महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे स्वत:चं घोषवाक्य स्वत:ला लावायचं, असं त्यांचं मत होत का? आम्ही संविधानाने रक्षक आणि जनतेच्या हितासाठी लढणारे लोक आहोत.

 

हे संवैधानिक व्यवस्थेला संपवण्याचे काम

लोकसभेच्या नव्या इमारतींचं (New Parliament Building) उद्घाटन होत आहे.
ही इमारत माती आणि विटांची नसते. तेथे संविधानिक मूल्य जोपासली गेली पाहिजेत.
हे लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे. त्याठिकाणी संविधानाची जोपासना केली जात नाही.
राष्ट्रपतींचा अपमान करणं, हे संवैधानिक व्यवस्थेला संपवण्याचं काम आहे,
अशी टीका नाना पटोले यांनी केली.

 

Web Title :  Maharashtra Politics News nana patole attacks devendra fadnavis and eknath shinde over uddhav thackeray and kejriwal meet comment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा