Maharashtra Politics News | ‘गौतम अदानी पवारांच्या घरी रहायला गेले तरी…’ काँग्रेसची खोचक टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | अदानी समुहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. तत्पूर्ती शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर सिल्व्हर ओकवर (Silver Oak) आल्यानंतर अवघ्या काही वेळातच गौतम अदानी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. सायंकाळी घडलेल्या या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) चर्चांना उधाण आले.

यावर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, कोण कोणाला भेटतो याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. अदानी पवारांच्या घरी रहायला गेले तरी आम्हाला त्याचे काही नाही. ते कोणाला भेटतात हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नाही, अशी खोचक टीका नाना पटोलेंनी केली. (Maharashtra Politics News)

 

पटोले पुढे म्हणाले, अदानींना आमचा कोणताही व्यक्तिगत विरोध नाही. मात्र, ज्या पद्धतीने देश विकून त्यांना दिला जातोय, जनतेचे पैसे लुटून आदानींना दिले जात आहेत. हे सर्व रेकॉर्डवर आले आहे. कोणाला व्यक्तीगत संबंध ठेवायचे असतील, तर ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, असेही पटोले म्हणाले.

आमचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे आहेत.
मोदी-अदानी यांचा संबंध काय? आणि अदानीच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कुठून आले?
सर्व कंपन्या अदानीलाच का विकल्या जात आहेत? अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती कडून
(Joint Parliamentary Committee) चौकशी करवी ही काँग्रेसची मागणी कायम आहे.
मोदी सरकार (Modi Government) ही मागणी मान्य का करत नाही? हा जनतेच्या पैशाचा प्रश्न आहे म्हणून
काँग्रेस जाब विचारत राहणार, कोणाला व्यक्तिगत संबंध ठेवायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे,
असे नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले.

Web Title :  Maharashtra Politics News | nana patole reaction over ncp chief sharad pawar and adani group gautam adani meet Silver Oak

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Shivrajyabhishek Sohala | आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याने व्यक्त केला संताप

Pune Mahavitaran News | चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने एमआयडीसीमध्ये (Chakan MIDC) भारनियमनाची शक्यता

MP Udayanraje Bhosale | ‘तटकरे कुठल्या पक्षात आहेत?’ तटकरेंच्या ‘त्या’ प्रश्नावर उदयनराजेंची खोचक प्रतिक्रिया