Maharashtra Politics News | ‘तेढ निर्माण होईल असं काही बोलू नका’, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं संजय राऊतांना सुनावलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) जागा वाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) बिघाडी होताना पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआची (Maharashtra Politics News) महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Group) वीस जागांवर दावा करण्यात आला होता. तर काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती. परंतु, अद्याप जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे मविआच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा जागावाटपाबाबत वक्तव्य केले आहे. यावरून काँग्रेसच्या बड्या नेत्याने राऊतांना चांगलेच सुनावले.

काय म्हणाले राऊत?

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडीची पहिली बैठक झाली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार विजयी होतील, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांना सुनावलं. (Maharashtra Politics News)

काय म्हणाले नाना पटोले?

जागावाटपावर कुठलीही चर्चा झालेली नाही. कुठल्या जागा कोणी लढवाव्यात याबाबत कोणी ही बोलू नये. मविआमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणीही बोलू नये. जी समिती स्थापन करण्यात आली आहे, तिच्या आधारावर निर्णय होईल, असं पटोले यांनी म्हटलं. तसेच प्रत्येक पक्ष आपली तयारी करत आहे. काँग्रेसने विधानसभेच्या 288 जागांवर तयारी सुरु केली आहे. पटोलेंच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

त्यानुसार ते निर्णय घेतील

सध्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLAs Disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे आहे.
यावर बोलताना पटोले म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यावर कोणीही टीका टिप्पणी करु नये.
त्यांना अधिकार दिले आहेत, त्याप्रमाणे निर्णय होईल, असे पटोले यांनी सांगितले.

Web Title :  Maharashtra Politics News | nana patole strongly criticized sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘ फडणवीस यांनी शरद पवार यांना…’

Solapur Crime News | सीआयडीचे पथक अटकेसाठी आल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr. PI), सहाय्यक निरीक्षकासह 7 पोलिस ‘फरार’

Maharashtra Politics News | ‘सुषमा अंधारेंचे काहीच चुकले नाही, पण बीडच्या जिल्हाध्यक्षांचे आरोप महत्त्वाचे’, भाजप आमदाराचे ठाकरेंवर गंभीर आरोप (व्हिडिओ)