Maharashtra Politics News | काँग्रेसने ठाकरे गटाच्या दाव्याची हवाच काढली, म्हणाले- ‘कोणाला किती जागा महत्त्वाचे नाही तर…’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) जागावाटपावर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांकडून वेगवेगळी विधानं केली जात आहेत. याच दरम्यान काँग्रेसच्या (Congress) कोर ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या जागा वापटावर चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. 2014 आणि 2019 मध्ये परिस्थिती वेगळी होती. आता मेरिटच्या आधारावर निर्णय होईल (Maharashtra Politics News) असं नाना पटोले यांनी सांगितले.

कोर ग्रुपची बैठक झाल्यानंतर आता दोन किंवा तीन जूनला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना बोलवून जिल्हानिहाय बैठक होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगतिलं.
यावेळी त्यांनी मेरिटच्या आधारावर निर्णय होणार असे सांगितले.
मात्र दुसरीकडे सुरुवातीला ठाकरे गटाकडून (Thackeray Group) वीस जागांवर दावा करण्यात आला होता.
अद्यापही ठाकरे गटाने 18 जागांवर दावा कायम आहे. आमचे महाराष्ट्रातून (Maharashtra Politics News) 18
तर दादर नगर हवेलीमधून एक असे एकूण 19 खासदार असल्याचे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) वारंवार करत आहेत.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर (Karnataka Election Result) महाविकास आघाडीची बैठक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी शिवसेनेने (Shivsena) वीस जांगावर दावा केला होता.
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं (NCP) समान वाटपाचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, 2014 आणि 2019 मध्ये परिस्थिती वेगळी होती.
आता मेरिटच्या आधारावर निर्णय होईल, कोणाला किती जास्त जागा मिळतील हे महत्त्वाचं नाही,
तर कोणाच्या किती जागा विजयी होतात याला महत्त्व आहे. पटोले यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले, जागा वाटपाची चर्चा ही महाविकास आघाडीमध्ये व्हावी यावर आमचा भर आहे.
विजयाच्या आधारावर जागा वाटप ठरवलं जाईल. कोणाची ताकद कमी झाली यावर चर्चा होणार नाही.
मात्र मेरिटच्या आधारावर जागा वाटप होईल, या सगळ्या विषयांवर एकत्रित चर्चा होईल.

Web Title :   Maharashtra Politics News | nana patoles reaction on seat allocation in mahavikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !

Ajit Pawar on Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणावरुन अजित पवारांचा समीर वानखडेंवर शाब्दीक हल्ला, म्हणाले- ‘तेव्हा मलिकांना खोटं ठरवण्याचा…’ (व्हिडिओ)