मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | कर्नाटकात भाजपचा (BJP) पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे मविआमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे मागील काही दिवसांपासून (Maharashtra Politics News) दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या आमदाराने थेट ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना इशारा देत, पक्षातील वाचाळवीरांना आवर घालण्याची विनंती केली आहे.
आदरणीय उद्धवजी,आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे,विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. रा.कॉ.पक्ष संकटकाळात आपल्या सोबत उभा राहिलाय . गल्लीतील टुकार "दादाहो "राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही VDO लावावे लागतील.@uddhavthackeray@AUThackeray
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 21, 2023
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि सुषमा अंधारे यांच्यात काही दिवसांपूर्वी आरोप प्रत्यारोप झाले होते. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर तो मागे घेतला. या काळातही संजय राऊतांनी (Sanjay Raut) राष्ट्रवादीवर टीका केली होती. सुषमा अंधारे (Maharashtra Politics News) यांच्याकडून राष्ट्रवादीवर केल्या जाणाऱ्या टीकेवरुन आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन ठाकरेंना इशारा दिला आहे. मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आदरणीय उद्धवजी,
आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे, विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा.
रा.कॉ.पक्ष संकटकाळात आपल्या सोबत उभा राहिलाय.
गल्लीतील टुकार “दादाहो” राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही VDO लावावे लागतील.
तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) टॅग केले आहे.
Web Title : Maharashtra Politics News | ncp amol mitkari appeal to uddhav thackeray to give warning to party spokesperson
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Anil Deshmukh | परमबीर सिंह यांच्या निलंबन रद्दचा आदेश बेकायदा आणि…, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप
- Pune Crime News | दुर्देवी ! भीमा नदीत बुडून 2 मुलांचा मृत्यू
- Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra | गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत एका दिवसात 8 तालुक्यातील 11 कामांना सुरुवात