Maharashtra Politics News | महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोणाचा?, शरद पवार म्हणाले…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने आगामी मुख्यमंत्री (CM) कोण होणार यावर वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. पुढचा मुख्यमंत्री (Maharashtra Politics News) शिवसेनेचा (Shivsena) होईल असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री होईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी म्हटलं आहे. तसेच पटोले असेही म्हटले होते की, कुठल्याही कारणामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) झाली नाही तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे.

 

शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून आलेल्या प्रतिक्रियानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) होईल असे म्हणाले होते. तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

 

शरद पवार म्हणाले, साधारणपणे तसंच असतं, ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो.
यात फारसं काही चुकीचं नाही. मात्र आमची यासंदर्भात अशी काही चर्चा झालेली नाही. ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे.
जोपर्यंत महाविकास आघाडीचा याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत हे मत मांडायला काही हरकत नसल्याचे शरद पवार म्हणाले.

 

जयंत पाटील अलिकडेच म्हणाले होते की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) हा राष्ट्रवादीचा असेल,
हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलं आहे. तितक्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. त्यामुळेच मला खात्री आहे
की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी हा पक्ष भविष्यात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो,
जयंत पाटलांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, जयंत पाटील यांनी कोणत्या समिकरणांच्या आधारे हे विधान केलं
हे मला माहिती नाही. ज्यांच्या आमदारांची संख्या जास्त असते, त्यांचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे सध्या काँग्रेसला यावर चर्चा करायची नाही.

 

Web Title :- Maharashtra Politics News | NCP Chief sharad pawar if maha vikas aghadi comes to power which party will make chief minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Ajit Pawar | शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता? प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले, म्हणाले – ‘ए…’