अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) वारंवार विरोधकांवर टीका करताना पाहायला मिळतात. भाजप (BJP), शिंदे गट (Shinde group) यांच्यासह मनेसवरही (MNS) अमोल मिटकरी यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. अशातच मिटकरी (Maharashtra Politics News) यांना धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. राज साहेबांवर (MNS Chief Raj Thackeray) वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार अशी धमकी मिटकरी यांना देण्यात आली आहे.
अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार, अशी व्हॉट्सअपवरुन धमकी देण्यात आली आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यामध्ये, मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्यांने मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली. राज्यातील (Maharashtra Politics News) जात्यांध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अकोला (Civil Line Police Station Akola) येथे तक्रार केली आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपींना तातडीने अटक (Arrest) करावी अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. यासोबत एफआयआर चा फोटो शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री कार्यालय आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टॅग केले आहे.
मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने आज मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली.राज्यातील जात्यांध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी सिविल लाईन पो. स्टेशन अकोला या ठिकाणी तक्रार गुन्हा दाखल झाला आहे.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis आरोपीस तात्काळ अटक करावी हि विनंती pic.twitter.com/o4dFyGpbjY
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 1, 2023
मिटकरींनी तक्रारीत काय म्हटले?
अमोल मिटकरी यांना शनिवारी (दि.1) धमकी आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की,
आज सकाळी 10.30 वा. मला माझ्या दूरध्वनी क्रमांकाच्या व्हॉटसअपवर अनोळखी इसमाने राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून,
नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार अशा आशयाचा मेसेज आला.
जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) व इशारा देणारा संदेश प्राप्त झाला आहे.
मला व माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
कृपया या गंभीर प्रकाराची दखल घेवून सदर अज्ञात इसमावर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी.
राज्यातील सध्याची परिस्थीती पाहता हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे व योग्य तपास व्हावा.
Web Title :- Maharashtra Politics News | ncp leader and mla amol mitkari receive threat message through whatsapp
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kalyan Crime News | कल्याणमध्ये ‘कशिश’ बारमधून 28 बारबालांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई