Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, विशेष विमानाने नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीकडून मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या जात आहे. (Maharashtra Politics News) बैठकीत आजी माजी आणि इच्छूकांची मतं जाणून घेतली जात आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे पंढरपूर येथील नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telangana CM KCR) यांच्या भेटीला गेले आहेत.

भगीरथ भालके यांच्यांसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (CM K. Chandrasekhar Rao) यांनी विशेष विमान (Special Plane) पाठवले आहे. याच विमानातून भालके हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. केसीआर यांनी सोलापूर विमानतळावर खास विमान पाठवलं. भालके 2024 मध्ये भारत राष्ट्र समितीकडून (Bharat Rashtra Samiti (BRS) विधानसभेची निवडणूक (Assembly Election) लढवणार असल्याची चर्चा आहे. केसीआर यांच्या भेटीदरम्यान काय ठरतं, यावर बरंच काही अवलंबून आहे. (Maharashtra Politics News)

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके (Bharat Bhalke) हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले होते. मात्र, भालके यांचे निधन झाल्याने पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी भगीरथ भालके यांचा पराभव करुन निवडणूक जिंकली.

बीआरएस पक्षाचे के. चंद्रशेखर राव यांनी मराठवाडा आणि सोलापूर परिसरात पक्ष वाढवण्यास सुरुवात केली आहे.
बीआरएस पक्षाने यापूर्वी मराठवाड्यात अधिवेशन घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले होते.
तसेच मराठवाड्यातील अनेक नेते बीएसआरच्या रडारवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधील माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) यांनीही के. चंद्रशेखर यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार (Sharad Pawar) आले असता
त्यांनी अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांना पक्षात प्रवेश देत 2024 च्या विधानसभा उमेदवारीचे संकेत दिले होते.
यामुळे भालके गट नाराज झाला आहे. या नाराजीचा फायदा बीआरएसने उचलला असून भगीरथ भालके
यांच्यासारखा तगडा उमेदवार गळाला लावण्यात केसीआर यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Web Title :  Maharashtra Politics News | ncp leader bhagirath bhalke went to meet cm of telangana kcr by special plane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | FDI मध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर वन, उद्योग बाहेर गेले म्हणणाऱ्यांची तोंडं बंद झाली; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

Kashish Social Foundation | कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने 25 हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

NCP Foundation Day | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली जय्यत तयारी पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला; कारण…

Ajit Pawar On Maharashtra IAS-IPS Transfers | ‘सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लाच घेतली’, अजित पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप