Maharashtra Politics News | ‘भाकरी फिरवताना ती कच्ची राहणार नाही हे बघा नाहीतर…’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा नेमका रोख कोणाकडे?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे (NCP OBC Cell) दोन दिवसीय शिबीर नागपूर येथे होत आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडण्याचं कारण सांगितलं. त्या काळात शिवसेना सोडणं सोपं नव्हतं. कारण तिथे आत जाण्याचा दरवाजा होता, (Maharashtra Politics News) मात्र बाहेर येण्याचा नाही. परंतु मी याच नागपुरातून शिवसेना सोडली. मी शिवसेना सोडून आलो ते ओबीसीसाठी, असे भूजबळ यांनी सांगितले.

 

भूजबळ पुढे म्हणाले, पवार साहेब ओबीसींचा विचार करत होते म्हणून मी त्यांच्यासोबत आलो. ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांच्या अध्यक्षते खाली समिती निर्माण झाली होती. त्यांनी डेटा तयार करावा असं सांगितलं. (Maharashtra Politics News) पण झालं नाही. दुसरी कमिटी मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मात्र, तेव्हाही काम झालं नाही. समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी संसदेत मुद्दा मांडला. अनेकांनी पाठिंबा दिला, शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी पाठिंबा दिला. 2016 मध्ये जो डाटा आला तो मोदी साहेबांकडे गेला. परंतु त्यांनी आकडा जाहीर केला नाही.

ओबीसी सेलमध्ये ईश्वर बालबुद्धे (Ishwar Balabuddhe) यांनी चांगलं काम केलं. मात्र, भाकरी फिरवण्यासाठी त्यांनी
अध्यक्ष पदावर दुसऱ्याला नेमले. मात्र, भाकरी पालटत असताना ती कच्ची राहू नये हे बघितलं पाहिजे. नाहीतर ती खाता येत नाही.
पवार साहेबांनी ओबीसी समाजासाठी मोठं काम केलं. शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा घेतला हे इतर पक्षात नाही.
बाकी पक्षात फक्त नावाला ओबीसी सांगतात. मात्र करणी वेगळी असते, अशी टीकाही छगन भुजबळ यांनी केली.

 

 

Advt.

Web Title :  Maharashtra Politics News | ncp leader chhagan bhujbal guided
workers in two day camp of obc cell in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा