Maharashtra Politics News | सामनाच्या अग्रलेखावरून मविआत बिघाडी, राष्ट्रवादीनं आघाडीतून बाहेर पडावं का? छगन भुजबळांचा राऊतांना संतप्त सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या राजीनामा (Resignation) नाट्यावर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) भाष्य केलं आहे. ‘शरद पवार हे मोठे नेते नक्कीच आहेत. परंतु त्यांच्या पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले’ असं मत शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया (Maharashtra Politics News) येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) या पुस्तकात जे काही म्हटलं आहे, त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मग संजय राऊतांनी (Sanjay Raut) हे सगळं उकरुन काढायची काय गरज आहे. त्यांना काय अडचण आहे. त्यांना असं वाटतं का की राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीतून (Maharashtra Politics News) बाहेर पडावं? मनभेद निर्माण व्हावेत. राऊत यांचं जेवढं आयुष्य आहे तेवढा शरद पवार यांचा राजकीय अनुभव आहे, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी राऊतांना सुनावलं.

दरम्यान, संजय राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे ग्रुप (Shinde Group) आणि त्यांच्या बॅगांवर ठेवलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule),
जयंत पाटील (Jayant Patil) असे अनेकजण नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.


काय म्हटलं अग्रलेखात?

शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर एक मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला देशाच्या राजकारणात मान असला,
तरी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.
या अग्रलेखात ठाकरे गटाने इतरही अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

 

Web Title :-  Maharashtra Politics News | NCP leader chhagan-bhujbal-strongly-criticized-sanjay-raut-on saamana editorial

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAF MiG-21 Crash | घरावर कोसळलं मिग-21 लढाऊ विमान; दोघांचा मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – बनावट सोने विकणार्‍या महिलेला अटक

Nana Patole | ‘सत्तेची भूक भागविण्यासाठी भाजप काहीही करायला तयार’, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – बनावट सोने विकणार्‍या महिलेला अटक

Ajit Pawar | शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता? प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले, म्हणाले – ‘ए…’