Maharashtra Politics News | एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडेंची बंद दाराआड चर्चा, धनंजय मुंडेंचं भाकीत खरं होणार?; राजकीय चर्चांना उधाण

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) या गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतीच रासपच्या (Rashtriya Samaj Party) कार्यक्रमात बोलताना नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या दोन नेत्यांमध्ये झालेल्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics News)

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची त्यांच्या यशश्री निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत रोहिणी खडसे (Rohini Khadse) आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) या देखील उपस्थित होत्या. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये यावेळी बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. पंकजा मुंडे यांनी नुकतंच ‘मला लोक म्हणतात पक्ष माझा. पण मी भाजपची (BJP) आहे. पण पक्ष माझा नाहीये.’ असं विधान केलं होतं. (Maharashtra Politics News)

धनंजय मुंडे काय म्हणाले होते?

दरम्यान, बहीण-भावाची जवळीक वाढत आहे, तुम्ही भविष्यात कमळ हाती घेणार का? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा त्या राष्ट्रवादीत येणार का? सध्याची परिस्थिती पाहता धनंजय मुंडे यांनी केलेलं भाकीत खरं होणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपात छळ होतोय

पंकजा मुंडे यांनी रासपच्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त केल्यावर एकनाथ खडसे म्हणाले होते, पंकजा मुंडे यांचे विधान दु:खद आणि वेदनादायी आहे. पंकजा मुंडे यांनी ज्या शब्दांत आपली उद्विग्नता व्यक्त केली ती अतिशय वेदनादायी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी पक्षासाठी उभं आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अवस्था असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजप पक्ष वर्षानुवर्ष ज्यांनी वाढवला, बहुजनांपर्यंत पोहचवला, अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपात छळ होत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता.

Advt.

Web Title :   Pune Police News | Avoid filing a case against the builder in Pune! Order of inquiry of PSI Bapu Khengre with PI Anil Shewale Of Sahakar Nagar Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुण्यातील बिल्डरविरूध्द गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ! पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश

Maharashtra Talathi Bharati 2023 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती, शासनाकडून आदेश जारी

MP Sanjay Raut | ‘बेईमान्यांवर वीर सावरकरही थुंकले होते, मग मी जी कृती…’, संजय राऊतांची प्रतिक्रिया

MP Sanjay Raut | अजित पवारांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले- ‘धरणामध्ये XXX…’