Maharashtra Politics News | ‘हवालदिल शेतकरी वाऱ्यावर… उपमुख्यमंत्री टाईमपास गप्पा मारायला शिवतीर्थावर!’, राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी (दि.29) रात्री उशिरा शिवतीर्थ या निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री दहाच्या सुमारास दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास बैठक झाली. फडणवीस यांनी राज ठाकरेंची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. (Maharashtra Politics News)
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर (Shivtirtha) लॉजिंग केलं तरी आम्हाला काही अडचण नाही. फडणवीस तिथे गेले आणि आठ दिवस राहिले तरी हरकत नाही. ते तिथे गेले कारण राज ठाकरे हे उत्तम होस्ट आहेत. ते लोकांचं आगत-स्वागत फार चांगलं करतात, अगदी पहिल्यापासून. (Maharashtra Politics News) फडणवीस यांना शिवतिर्थावर जायची इच्छा झाली असेल तर त्यांनी तिथे जावं. मुळात कोण कोणाकडे जातंय याच्यामुळे शिवसेनेचं भविष्य मार्गी लागत नाही, शिवसेना ही शिवसेनेच्या जागेवर असल्याचे राऊत म्हणाले.
फडणवीस ठाकरे भेटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीने या भेटी विरोधात पोस्टरबाजी केली आहे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे कार्य़ाध्यक्ष
राज राजापूरकर (Raj Rajapurkar) यांनी मुंबईत पोस्टर लावले आहेत. यावर लिहिले की,
हवालदिल शेतकरी वाऱ्यावर.. बेरोजगार युवा रस्त्यावर… महाराष्ट्र महागाईच्या धगधगत्या निखाऱ्यावर…
आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मात्र टाईमपास गप्पा मारायला शिवतीर्थावर!
Web Title : Maharashtra Politics News | ncp says devendra fadnavis meet raj thackeray for time pass chat
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Prakash Ambedkar | ‘…म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा’, प्रकाश आंबेडकरांची मागणी