Maharashtra Politics News | ‘…मस्तवाल मुलाचा बाप’, केंद्रीय मंत्र्यांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री (Union Home Minister) अजय कुमार मिश्रांबाबत (Ajay Kumar Mishra) माध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावर शरद पवारांनी ‘कोण मिश्रा? मी त्यांना ओळखत नाही’ असा टोला लगावला होता. यावर मिश्रांनी प्रत्युत्तर देताना, (Maharashtra Politics News) शरद पवार यांना मीसुद्ध ओळखत नाही. 5 ते 6 खासदार (MP) असलेल्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही, असा पलटवार मिश्रा यांनी केला होता. तसेच शरद पवारांनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं आव्हान दिलं.

मिश्रा यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ट्विट करुन उत्तर
दिलं आहे. रोहित पवारांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली
चिरडणाऱ्या मस्तवाल मुलाचा बाप’, अशी ‘ओळख’ करून देण्याची वेळ आदरणीय पवार साहेबांवर कधी आली नाही, हे सत्ता डोक्यात भिनलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना राज्यातल्या एखाद्या भाजप (BJP) नेत्याने सांगण्याची गरज आहे. (Maharashtra Politics News)

रोहित पवारांनी लिहिलं की, आपल्या मुलाने केलेल्या ‘कर्तृत्वावर’ वडील म्हणून राजीनामा दिला असता तर
त्यांना गांभीर्याने घेतलं असतं. राहिला प्रश्न त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा,
तर लढत ही तुल्यबळांच्यात होत असते. आदरणीय पवार साहेबांची राजकीय कारकीर्द मिश्रा यांच्या वयापेक्षा
जास्त आहे, त्यांनी साहेबांना विरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान देणं हे निव्वळ हास्यास्पद आहे.
त्यांच्या वक्तव्याची बातमी झाली यातच त्यांनी समाधान मानावं.

Web Title : Maharashtra Politics News | rohit pawar slams ajay kumar mishra for his comment on sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Violence | कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘आता जे झालं ते झालं, यापुढे…’

Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन

BJP Election Chiefs In Maharashtra | भाजपकडून मिशन लोकसभा सुरू ! पुण्यात मुरलीधर मोहोळ, बारामतीमध्ये राहुल कुल, शिरूरमध्ये महेश लांडगे तर मावळची जबाबदारी प्रशांत ठाकुर यांच्यावर, जाणून घ्या 48 नेत्यांच्या नावांची संपूर्ण यादी (व्हिडिओ)