Maharashtra Politics News | देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीवर ठाकरे गटाची टीका, म्हणाले- ‘राज ठाकरे उत्तम होस्ट ते…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाराष्ट्रात शिवसेने-भाजप युती (Shiv Sena-BJP Alliance) तुटल्यानंतर भाजपला शिवसेनेच्या जागी पर्याय हवा आहे. यासाठी राज ठाकरे हे पर्याय बनू शकतात असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. तसेच मागील काही महिन्यात राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अनेकवेळा भेटीगाठी झाल्या आहेत. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील दोन वेळा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. काल पुन्हा एकादा देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात ( Maharashtra Politics News) चर्चांना उधाण आले.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर (Shivtirtha) लॉजिंग केलं तरी आम्हाला काही अडचण नाही. फडणवीस तिथे गेले आणि आठ दिवस राहिले तरी हरकत नाही. ते तिथे गेले कारण राज ठाकरे हे उत्तम होस्ट आहेत. ते लोकांचं आगत-स्वागत फार चांगलं करतात, अगदी पहिल्यापासून. ( Maharashtra Politics News)
राऊत पुढे म्हणाले, फडणवीस यांना शिवतीर्थावर जायची इच्छा झाली असेल तर त्यांनी तिथे जावं.
इतरही लोकांनी जावं. तिथे आठ दिवस रहावं. शिवतीर्थावर सकाळी वॉकला जावं.
तिथे उत्तम पदार्थ मिळतात, चांगले हॉटेल्स आहेत. मुळात कोण कुणाकडं जातंय याच्यामुळे शिवसेनेचे भविष्य
मार्गी लागत नाही, शिवसेना ही शिवसेनेच्या जागेवर असल्याचे राऊत म्हणाले.
अराजकीय गप्पांसाठी शिवतीर्थावर गेलो – फडणवीस
दरम्यान, राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिलं.
अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थवर (Shivtirtha) गेलो होतो. बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं.
की एक दिवस गप्पा मरायला बसू आणि काल तो मुहूर्त निघाला. असं ठरलं होतं की राजकीय सोडून गप्पा करायच्या.
गप्पा या अराजकीय असतात, असं फडणवीस यांनी सांगितलं.
Web Title : Maharashtra Politics News | sanjay raut mocked devendra fadnavis raj thackeray meet says mns chief is good host
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा