Maharashtra Politics News | ‘घुसमट होत असेल तर पंकजाताईंनी…’, ठाकरे गटाच्या नेत्याचा पंकजा मुंडेंना सल्ला

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ठाकरे गटाची (Thackeray Group) आज बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा (Maha Prabodhan Yatra) आयोजित करण्यात आली आहे. यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. तत्पूर्वी दोघांनी परळीच्या वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी परळीचे आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांनी दोघांचे स्वागत केले. यानंतर संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद (Maharashtra Politics News) साधताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.

संजय राऊत म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आठवण इथेच नाहीतर सर्व ठिकाणी येते, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics News) पेच निर्माण होतो, त्या प्रत्येकवेळी गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण होते. विशेषत: पंचवीस वर्षापेक्षा जास्त शिवसेना भाजप युतीमध्ये (Shiv Sena BJP Alliance) होतो. एकत्र राहिलो कधीकाळी मतभेद झाले असतील. भाजपमध्ये हे सर्व मतभेद दुरुस्त करणारे जे मंडळ होते त्यात गोपीनाथराव होते. एक अत्यंत जिंदादिल, दिलदार दिलखुलास असं राजकारणातलं व्यक्तिमत्व होते.

ते असते तर युती तुटली नसती

शिवसेना-भाजप युती रहावी आणि ती अखंड टिकावी, हे त्यांचे स्वप्न होते. बाळासाहेब ठाकरेंवर (Balasaheb Thackeray) त्यांची श्रद्धा होती. ठाकरे परिवाराशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्यानंतर ती सगळी नाती तुटली. कदाचित ते असते तर युती तुटली नसती, अशी खंत संजय राऊतांनी बोलून दाखवली.

आता ती भाजप राहिली नाही

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही दिल्लीत जी भाजपा पाहिली ती अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), लालकृष्ण अडवाणींची (LK Advani) होती. तर महाराष्ट्रात (Maharashtra BJP) गोपीनाथरावांची भाजप पाहिली. मात्र आता ती भाजप राहिली नाही. वारसा असतो मात्र त्या नेतृत्वाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे एकच व्यक्तिमत्व, त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांचीही बरोबरी कोणी करु शकत नाही. आम्हाला पंकजा मुंडेंकडून (Pankaja Munde) अपेक्षा आहे की, गोपीनाथराव ज्या निर्भयपणे, बेडरपणे राजकारणात वावरले, झुंजले त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांच्यामुळे भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. पंकजाताईंनीदेखील तेच करावं, असं संजय राऊत म्हणाले.

पंकजाताईंची घुसमट होत असेल तर…

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटीचा छापा (GST Raid) पडला आहे.
याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना विचारलं की, पंकजाताईंची घुसमट होतेय असं बोललं जातंय.
यावर बोलताना राऊत म्हणाले, त्यांची घुसमट होत असेल तर मुंडेसाहेबांचा वारसा म्हणून त्यांनी निर्भयपणे पुढे
आले पाहिजे, असा सल्ला संजय राऊतांनी पंकजा मुंडे यांना दिला.

Web Title : Maharashtra Politics News | sanjay raut says pankaja munde should come forward fearlessly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

The Kerala Story News | ‘द केरला स्टोरी’च्या शो वरून पुण्यातील एफटीआयआय मध्ये तुफान राडा; निर्माता व दिग्दर्शकही उपस्थित

Devendra Fadnavis | ‘ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल त्यांना…’, नोटबंदीवर फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं (व्हिडिओ)

ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात