Maharashtra Politics News | उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत विधानभवनात एन्ट्री, शिंदे गटात चलबिचल?, शंभूराज देसाई म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics News) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सामना रंगला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे असताना गुरुवारी विधानभवनात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics News) चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. दोन्ही नेत्यांनी एकत्र एन्ट्री केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे दोघेजण एकमेकांशी संवाद साधत विधानभवनात आले. यावर शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी भाष्य केलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहून बरं वाटलं असतं. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असेल, शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तर, आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र काम करा, असं फडणवीसांनी म्हटल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे शिंदे गटात चलबिचल (Maharashtra Politics News) आहे,
असं महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते बोलत आहेत,
याबाबत विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले, आमच्या लोकांच्या चालण्यात, बोलण्यात कुठं जाणवलं का?
आम्ही नेहमीप्रमाणे अधिवेशनाचं आणि दिलेल्या विभागाचं काम करत आहे.
चलबिचल आणि चिंता करण्याचं काम आमच्या पक्षात नाही.
उलट सरकार पडेल म्हणून मविआकडून तारखांवर तारखा दिल्या जात आहेत.
मात्र शिंदे-फडणवीस सरकार भक्कम असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Web Title :-Maharashtra Politics News | shambhuraj desai on uddhav thackeray and devendra fadnavis meet vidhansabha mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | 40 टक्के करासहीत भरलेली रक्कम परत कारावी, महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Crime News | पुण्यातील नाना पेठेत थरार ! हत्याराचा धाक दाखवुन भरदिवसा व्यापार्‍याचे 47 लाख लुटले