Maharashtra Politics News | ‘शरद पवारांची देशात विश्वासार्हता राहिली नाही’, शिंदे गटाच्या नेत्याचे टीकास्त्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवसेना नेते विजय शिवतारे (Shiv Sena Leader Vijay Shivtare) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. बारामती मतदारसंघातील (Baramati Constituency) निवडणूक शरद पवार आणि राष्ट्रवादीला अवघड जाणार आहे. शरद पवार मोठे नेते आहेत त्यांचे कर्तुत्व होतं. पण देशात पवारांची विश्वासर्हता राहिली नसल्याचे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते. (Maharashtra Politics News)
विजय शिवतारे म्हणाले, बारामती मतदारसंघात पाप करुन चुकीच्या आणि लोभी लोकांना निवडून देत देशभर चुकीचा संदेश गेला. दोन-दोन पंतप्रधानांना बारामतीत आणून मूर्ख बनवायचं आणि तुला दाखवायचा. पुरंदर, दौंड, भोर, खडकवासला, इंदापूर मध्ये काय केलं हे दाखवा. सगळे प्रकल्प एका ठिकाणी आणत ते दाखवून मूर्ख बनवायचं, अशी टीका त्यांनी केली. (Maharashtra Politics News)
आता फुकटची मतं मिळणार नाहीत
चाळीस वर्ष शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आम्ही मतदान केले. याबद्दल आम्हाला काय मिळालं? आता फुकटची मतं मिळणार नाहीत, हा निर्णय जनतेने घेतला आहे. सखा पाटील (Sakha Patil) आणि इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचाही पराभव झाला होता. देशभरात ब्लॅकमेलिंगचं काम करणाऱ्या लोकांना घरी बसवण्याचे काम बारामती मतदारसंघालाच करावे लागेल, असेही शिवतारे यांनी म्हटले.
पवारांची विश्वासार्हता राहिली नाही
बारामती मतदारसघातील निवडणूक शरद पवार आणि राष्ट्रवादीला कठीण जाणार आहे. शरद पवार मोठे नेते असून, त्यांचं कर्तुत्व होतं. मात्र देशात पवारांची विश्वासार्हता राहिली नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींना व्यक्तीगत शरद पवार किंवा पवार कुटुंब नाहीतर, लोकशाहीचा वापर करुन सरंजामशाहीने वागणाऱ्यांना बारामती मतदारसंघात पराभूत करणे काळाची गरज असल्याचे शिवतारे म्हणाले.
Web Title : Maharashtra Politics News | ‘Sharad Pawar no longer has credibility in the country’,
the criticism of the leader of the Shinde group
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023 | कोथरूड येथील ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्यात 1 हजार 381 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
- Chiranjeevi Konidela | दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीला खरचं झाला आहे का कॅन्सर?, ट्विट करत दिली माहिती
- Maharashtra Politics News | शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी?, ‘शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व, आम्हाला…’, शिवसेना मंत्र्याचा भाजपला इशारा