Maharashtra Politics News | शेतकरी महासन्मान योजना फसवी, काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांवरुन महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला आहे. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. तसचे शेतकऱ्यांची लूट सुरु असून सरकारला शेतकऱ्यांना (Maharashtra Politics News) खरच मदत करायची असेल तर त्यांनी कृषी साहित्यावरील जीएसटीतून (GST) होत असलेली लूट थांबवावी असे पटोले यांनी म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार (BJP Government) असो वा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकर दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करूनही अद्याप शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. (Maharashtra Politics News) शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देण्याचा डाव आहे. मात्र, सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाही. खते, बि-बियाणे, शेती साहित्यावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट सुरु असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

नुकसानभरपाई जाहीर केली मात्र ती अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. भाजपप्रणित शिंदे सरकार (Shinde Government) केवळ घोषणा करत आहे. शेतकऱ्यांकडून 100 रुपये लुटायचे आणि 1 रुपयाची मदत द्यायची ही बनियावृत्ती आहे. निवडणुका डोळ्यासमोर असल्याने त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली. मात्र शेतकऱ्यांवर या तुटपुंज्या मदतीचा काहीही परिणाम होणार नाही, असंही पटोले म्हणाले.

 

शेतकरी महासन्मान योजनेवरुन (Shetkari Mahasanman Yojana)
शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले,
शेतकरी महासन्मान योजना ही फसवी आहे. महागाईमुळे शेती करणे परवडत नाही.
शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार या वल्गना हवेत विरल्या आहेत.
शेतकऱ्यांमध्ये भाजप बद्दल तीव्र संताप आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

 

Web Title : Maharashtra Politics News Shetkari Mahasanman scheme is fraudulent, Congress accuses Shinde-Fadnavis government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा