Maharashtra Politics News | शिंदे गटाचा उध्दव ठाकरेंना इशारा, म्हणाले – ‘काँग्रेस, राष्ट्रवादी तुमचं काय हाल करेल…’

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल (Maharashtra Political Crisis)आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्यातील सरकार हे बेकायदेशीर असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटासह विरोधकांकडून (Maharashtra Politics News) केली जात आहे. राज्यातील सरकारने नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या विधानावरुन शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad ) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्या विधानाचा समचार घेतला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या (Maharashtra Politics News) गप्पा मारु नयेत. राज्यातील जनतेने शिवसेना (Shivsena) भाजपला (BJP) राज्यात निवडून दिलं होतं. परंतु सत्तेच्या लालसेपायी तुम्ही राष्ट्रावादी (NCP) आणि काँग्रेसला (Congress) सोबत घेऊन जनतेशी गद्दारी केली. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही निवडून येऊच. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमचे काय हाल करते हे तुम्हीच बघा, असं म्हणत गायकवाड यांनी ठाकरेंना इशारा दिला आहे.

 

 

श्रीकांत शिंदे यांचाही आदित्य ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) शिंदे गट आणि ठाकरे गटात (Thackeray Group) आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुंबई पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
नुकतीच आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन भ्रष्टाचाराची माहिती दिली. त्याच्या चौकशीची मागणी लोकायुक्तांकडून (Lokayukta)
करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. यावर खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी पलटवार केला होता.

 

Web Title :- Maharashtra Politics News | shinde-group-mla-sanjay-gaikwad-warn-uddhav-thackeray-over-ncp-and-congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर…’, राज ठाकरेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर

Jayant Patil | ‘कायदा व सुव्यवस्था राखणं पोलीस दलाचं काम पण…’; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ आरोपांवरुन जयंत पाटलांचा
गृहमंत्र्यावर निशाणा

Karnataka Election Result 2023 | कर्नाटकच्या निकालावर राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा, म्हणाले –
‘हा पराभव भाजपाच्या…’

IPS Praveen Sood Appointed As CBI Director | वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या
संचालकपदी नियुक्ती; जाणून घ्या प्रवीण सूद यांच्याबद्दल थोडक्यात