Maharashtra Politics News | निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले, शिंदे गटाच्या नेत्या खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | मागील काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांसंदर्भात (NCP Chief Sharad Pawar) गौप्यस्फोट केला. यानंतर गौप्यस्फोट करण्याची मालिकाच सुरु झाल्याचे (Maharashtra Politics News) पहायला मिळत आहे. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटातील (Thackeray Group) वाढत्या संघर्षामुळे दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, गौप्यस्फोट केले जात आहेत. आता यातच शिंदे गटाच्या नेत्याने अजित पवार आणि रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्याबाबत एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा मोठा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवारांनी रोहित पवारांना निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदाची निवडणूक (Presidential Election)
जानेवारी महिन्यात झाली होती. या निवडणुकीत रोहित पवार निवडून आले.
परंतु, आता या निवडणुकीवरून महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics News) तापण्याची चिन्ह असल्याचे सांगितले जात आहे.
पवार कुटुंबात कोणती व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते, अजित पवार साहेब,
आधी आपले घरातील बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा, असा पलटवार नरेश म्हस्के यांनी केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याचा खळबजनक गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला आहे.

मुख्यमंत्री पदावर आधी एकमत करा

भावी मुख्यमंत्री (Future Chief Minister) कोण हे आपल्या स्वत:च्या पक्षात एकमत करा आणि मग इतरांवर टीका करा.
अजित दादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले जातात. जयंत पाटील (Jayant Patil) यांचा बॅनर लावला जातो,
सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचा देखील बॅनर लावला जातो, नक्की तीन तीन मुख्यमंत्री करणार आहात का,
असा खोचक सवाल नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Web Title :-  Maharashtra Politics News | shiv sena shinde group naresh mhaske big statement on ajit pawar and rohit pawar over mca election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC – Mahavitaran – MahaPreit | महापालिका आणि महाप्रीतच्या व्यवहारात मोठी आर्थिक अनियमीतता ! वीज पुरवठा दरात महापालिकेची फसवणूक झाल्याचा संशय

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Pune Crime News | 50 हजारांवर अडीच लाख परत केल्यानंतरही 55 हजारांची मागणी करुन धमकाविणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल, चंदननगर पोलीस ठाण्यात FIR