Maharashtra Politics News | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘पहाटेचा शपथविधी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Senior BJP Leader Sudhir Mungantiwar) यांनी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवर (Morning Swearing) मोठं विधाने केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धडा शिवण्यासाठी होता असे विधान केले होते. मुनगंटीवार यांच्या विधानावर राजकीय नेत्यांच्या (Maharashtra Politics News) प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुनगंटीवार यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी केली आहे. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde Group MLA Sanjay Shirsat) यांनी मुनगंटीवार यांच्या विधानाचे समर्थन केलं आहे.

संजय शिरसाट म्हणाले, पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी झाला होता हे बरोबर आहे. त्यात काहीच चुकीचं नाही. मुळात तुम्ही भाजपसोबत युतीत निवडणूक लढता. प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो लावून लोकांची मतं मागता. प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या मतांवर तुम्ही निवडणूक लढलात (Maharashtra Politics News) आणि जिंकलात. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) जाता.

शिरसाट पुढे म्हणाले, 2019 मध्ये शिवसेना (Shivsena) भाजप सरकार येईल या आनंदात होतो. पण अचानक बदल झाल्यानं आपण भाजपसोबत जाणार नाही असं कळले. त्यानंतर भाजपने पहाटेच्या शपथविधीची जी खेळी केली, ती योग्य होती. उद्धव ठाकरे यांना आम्ही धडा शिकवला, ज्यासाठी भाजपने आम्हाला सहकार्य केले, असे म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

 

 

काय म्हणाले होते मुनगंटीवार?

भाजपसोबत युती करुन निवडून आल्यावर उद्धव ठाकरें ज्या प्रमाणे वागले,
त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला.
मी 16 मार्च 1995 रोजी निवडून आलो होतो. त्यावेळी आम्ही शिवसेना नेत्यांसोबत एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो.
तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला काँग्रेसबरोबर जाणार नाही किंवा मदत करणार नाही,
अशी शपथ दिली पोती. मात्र, उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले.

 

Web Title :- Maharashtra Politics News | Shivsena mla sanjay-shirsat-says-devendra-fadanvis-and-
ajit-pawar-morning-swearing-was-correct-move

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने
मोठ्या प्रमाणात साजरी करणार; किल्ले पुरंदर येथील शासकीय जयंती कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Pune Crime News – Lonikand Police Station | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – वाघोलीत संगणक अभियंता तरुणाचा खून