Maharashtra Politics News | ‘संजय राऊत कलीयुगातील शकुनीमामा’, अयोध्या दौऱ्यावरुन पतरल्यावर शिंदे गटाचा राऊतांवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दोन दिवसांचा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) आटपून परतले आहेत. अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार, खासदार, नेते हे देखील अयोध्येला गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन (Maharashtra Politics News) विरोधकांनी टीका केली होती. यामध्ये खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सामनातून टीका केली होती. यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सामना हे आता राष्ट्रवादीचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते, अशी टीका केली.
संजय शिरसाट यांनी ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सामना हे आता राष्ट्रवादीचे (NCP) मुखपत्र म्हणून ओळखले जाते. संजय राऊत यांच्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे राम आहेत, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लक्ष्मण आहेत. संजय राऊत हे कलियुगातील शकुनीमामा आहेत. त्यांना फक्त भांडण लावायला (Maharashtra Politics News) जमतं असा टोला शिरसाट यांनी राऊतांना लगावला.
शिरसाट पुढे म्हणाले, अयोध्येमध्ये मंदिरापर्यंत जायला आम्हाला दोन तास लागले. त्यामुळे तेथे आलेले लोक स्वयंस्फूर्तीने आले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही गेलो होतो त्यावेळेस पण असे स्वागत झाले नव्हते. ज्या पद्धतीने आमचे स्वागत झाले. त्यामुळे संजय राऊतांची पोटदुखी वाढली असल्याची घणाघाती टीका शिरसाट यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आठवण सांगताना शिरसाट म्हणाले,
बाबरीचा ढाचा माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल, तर आम्हाला त्याचा अभिमान आहे असे म्हणणारे
शिवसेनाप्रमुख आणि आता रामाच्या यात्रेवर आम्ही गेलो यावर टीका करणारे संजय राऊत हा विरोधाभास आहे
आणि आम्ही याला महत्त्व देत नाही, अशी टीकाही संजय शिरसाठ यांनी केली आहे.
Web Title : Maharashtra Politics News | shivsena mla sanjay shirsath criticize thackeray group mp sanjay raut ayodhya visit
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
MP Supriya Sule | अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं