मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics News | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान आता मतदानाला काहीच दिवस उरले असताना महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अद्याप जागावाटप पूर्ण झालेले नाही. याच जागावाटपावरून काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय.
त्यातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली आहे. तसंच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती तसेच फोनवर संभाषण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तशी वृत्ते माध्यमातूनही समोर आली. महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल पासून उद्धव ठाकरे महायुतीत येणार का? इथपर्यंतच्या चर्चा सुरु झाल्या.
त्याबाबत आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ” उद्धव ठाकरेआणि अमित शहा यांच्यात कुठलीही भेट झालेली नाही. आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भाजपाकडून होत आहे. कारण राज्यात भाजपा हा घाबरलेला पक्ष आहे. संजय राऊतांना तुरुंगात कुणी धाडलं? त्यामुळे अशी कुठलीही चर्चा झालेली नाही हे लक्षात ठेवा.(Maharashtra Politics News)
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. जागावाटपाचा सगळा प्रश्न मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल. आमची हायकमांडशी चर्चा जागावाटपाचा पेच कसा सोडवायचा त्याबद्दल होती.
आत्ता आलेली जी बातमी आहे त्यामध्ये अजिबात एक टक्काही तथ्य नाही. ही बातमी पेरली गेली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्यात वाद निर्माण व्हावा असा काही लोकांचा उद्देश आहे”, असे म्हणत वडेट्टीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa