Maharashtra Politics News | ‘लोकसभेच्या ‘त्या’ 22 जागा आमच्याच’, कीर्तिकरांच्या दाव्यावर भाजपची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | भाजपकडून (BJP) शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) 13 खासदारांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा दावा खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी केला आहे. तसेच लोकसभेला 22 जागांवर दावा करणार का? यावर बोलताना कीर्तिकर (Maharashtra Politics News) यांनी दावा करण्याची गरज नाही 22 जाग शिवसेनेच्या आहेत, असे म्हटले होते. यावर भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या दाव्यावर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. (Maharashtra Politics News) या पक्षाचं नेतृत्व पूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Late Balasaheb Thackeray) करत होते. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नेतृत्व करत आहेत. युतीत एकनाथ शिंदे यांचा, शिवसेनेचा आणि त्यांच्या मागण्याचा सन्मान होणार आहे.

भाजपला त्यांच्या 22 जागांचा दावा मान्य नाही असं तुम्हाला कोणी बोललं नाही.
असं काही वक्तव्य भाजपच्या कुठल्याही नेत्याने केलं नाही.
त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे जागावाटपासारखे महत्त्वाचे प्रश्न असे टीव्हीवरच्या चर्चेने सुटत नाहीत.
हा प्रश्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे चर्चा करुन सोडवतील.

जनतेचे हित हेच आमचे ध्येय

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, जागावाटपावर भाजपकडून कोणी काही बोललंय का, किंवा आमच्यापैकी ती मागणी कोणी नाकारली आहे का? विधानसभेच्या जागांचं वाटप असेल किंवा लोकसभेचा प्रश्न असेल, आम्ही एकत्र आहोत, एकत्र विचार करतो, एकत्र बसून निर्णय घेतो. आमचं ध्येय हे खुर्ची, जागा, सत्ता यापेक्षाही मोठं आहे. जनतेचे हित हेच आमचं ध्येय आहे. त्यामुळे जागेसाठी भाजप दुराग्रह करणार नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं.

काय म्हणाले कीर्तिकर?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) जागावाटपाबाबत बोलताना कीर्तीकर म्हणाले,
लोकसभेच्या 22 जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही.
2019 मध्ये शिवसेना-भाजप एकत्र असताना जागावाटप झाले त्यावेळी आम्ही 23 तर भाजपने 26 जागा लढवल्या.
त्यापैकी भाजपच्या 22 तर आमच्या 18 जागांवर खासदार निवडून आले. त्यामुळे आगामी निवडणुकीत हेच सूत्र राहील.
त्यानुसार आमची तयारी झाली असल्याचा दावा कीर्तिकर यांनी केला आहे.

Web Title : Maharashtra Politics News | sudhir mungantiwar on gajanan kirtikar lok sabha seats demand shivsena bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी? शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप; म्हणाले- ‘शिंदे गटाच्या खासदारांना भाजपकडून सापत्न…’

Pune Metro Structural Audit | पुणे मेट्रो स्थानके आहेत पूर्णपणे सुरक्षित; सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा अहवाल

Deepak Kesarkar | मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? दीपक केसरकर यांनी स्पष्टचं सांगितले