Maharashtra Politics News | ‘…तर बावनकुळेंनी बारामतीमधून अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवावी’, राष्ट्रवादीच्या आमदाराचं खुलं आव्हान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला (Maharashtra Politics News) सुरुवात केली आहे. भाजपने (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर (Baramati Lok Sabha Constituency) लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे अनेक नेते बारामती मतदारसंघाचा दौरा करत आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आम्ही बारामती जिंकू, पुणे जिल्ह्यात बदल झाल्याचे पाहायला मिळेल असे वक्तव्य (Maharashtra Politics News) केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (MLA Dilip Mohite Patil) यांनी बावनकुळे यांना बारामती मतदारसंघातून अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.

दिलीप मोहिते पाटील म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे एवढे मोठे नेते असते तर मागील निवडणुकीत त्यांचं तिकीट का कापलं. त्यांची निवडून येण्याची खात्री नव्हती म्हणून त्यांना तिकीट नाकारण्यात आले. आता ज्याला स्वत: निवडून येण्याची खात्री नाही, जो व्यक्ती मागच्या दाराने विधान परिषदेत (Legislative Council) आला त्याने बारामती विषयी काय बोलावं. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी (Maharashtra Politics News) पार पाडण्यासाठी ते तसं बोलत असतील, असा टोला त्यांनी बावनकुळे यांना लगावला.

मोहिते पाटील पुढे म्हणाले, ऊर्जा खातं अजित पवार यांच्याकडे होतं तेव्हा बावनकुळे ठेकेदारीचं काम करत होते. हे आम्ही पाहिलं आहे. ते त्यावेळी दिवसभर अजित पवारांच्या कार्यालयात बसलेले असायचे. आता पद आल्यावर ते बारामतीबाबत बोलत असतील, तर त्यांना एकदा अनुभव घ्यायला हरकत नाही. अनेकांनी बारामती जाऊन अनुभव घेतला आहे. बावनकुळे यांनी देखील बारामतीचा अनुभव घ्यावा, असे थेट आव्हान दिलीप मोहिते पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.

माझी त्यांना विनंती आहे की, बावनकुळे यांनीच बारामतीमधून निवडणूक लढवावी. म्हणजे त्यांना कळेल.
त्यांनी इतरांचा बळी देऊ नये. बावनकुळे सरकार आहेत, तर त्यांनीच बारामतीत येऊन अजित पवार यांच्या
विरोधात निवडणूक लढवावी. त्यानंतर त्यांना अजित पवारांची ताकद कळेल, असे दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Web Title :   Maharashtra Politics News | ‘…then Chandrashekhar Bawankule should contest elections from Baramati against Ajitdada’, NCP MLA’s open challenge

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘तेढ निर्माण होईल असं काही बोलू नका’, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं संजय राऊतांना सुनावलं

Sushma Andhare | ‘….तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का’, जाधव यांच्या दाव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Pune Railway Station News | पुणे रेल्वे स्थानकावर निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ व पाणी बॉटल विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईचा दणका