Maharashtra Politics News | ‘सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही’, पृथ्वीराज चव्हाणांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) लांबणीवर पडल्या आहेत. अनेक महानगरपालिका (Municipal Corporation), नगरपालिका (Municipality), जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समित्या गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. यामुळे या निवडणुका कधी होणार याकडे राजकीय नेत्यांचे (Maharashtra Politics News) लक्ष लागल आहे. दरम्यान, देशातील एकूण चित्र पाहता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) निवडणुकीस सामोरे जाण्याच्या तयारीत नाही. त्यांना पराभवाची धास्ती असल्याने ते निवडणुका टाळत आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांनी लगावला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने (Maharashtra Pradesh Congress Committee) दोन दिवसांची आढावा बैठक आयोजित केली आहे. यामध्ये सर्व 48 मतदारसंघातील परिस्थितीचा आढाव घेतला जात आहे. ही जागावाटपाची बैठक नसून फक्त स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी यांची मते अमावली जात असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, चर्चा सकारात्मक होत असून राज्यातील शिंदे-फडणवीस या जातीवादी सरकारला गाडण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
राज्य सरकारने (State Government) ज्या प्रकारे मविआ सरकार पाडले त्याचा तीव्र संताप जनतेत आहे.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गद्दारी केल्याचा संदेश जनमानसात गेला असून महाविकास आघाडी
(Mahavikas Aghadi) करुन निवडणुका लढवल्या जाव्यात असा एकंदर सुर या बैठकीत उमटत असल्याचे
चव्हाण यांनी सांगितले.

Web Title : Maharashtra Politics News | there is no threat of facing elections in shinde fadnavis government says Former CM Prithviraj Chavan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा नितेश राणेंवर ‘प्रहार’

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा