Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंनी मविआ पासून दूर रहावे’, प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर उदय सामंत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यास इच्छू आहे. परंतु जागावाटपावरुन मविआमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीचा (Maharashtra Politics News) भाग होण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावरुन शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी यावर प्रतिक्रिया देताना, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) बरोबरच बोलले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीपासून दूर रहावे, असा सल्ला आहे.

 

उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर टीका केली. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते की, महाविकास आघाडीच्या नादी लागू नये. त्यावर बोलताना सामंत यांनी (Maharashtra Politics News) उद्धव ठाकरेंवर टीका केली. प्रकाश आंबेडकर हे तळागाळात काम करणारे नेते आहेत. ते जर बोलत असतील तर त्यावर ठाकरेंनी विचार करणे आवश्यक आहे. ठाकरे गट आणि वंचित यांनाच एकत्र यावे लागेल. मविआ मध्ये प्रकाश आंबेडकर किती कंफर्टेबल असतील मला माहित नाही.

काँग्रेस (Congress) नेते केंद्रीय नेतृत्वात अडकले आहेत. तर राष्ट्रवादीचे (NCP) नेते कुटुंबवादात अडकले आहेत,
असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, मी काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो.
पण 2014 ला राष्ट्रवादी सोडली. आता मी शिवसेनेत आहे. मात्र एवढे निश्चितपणे सांगतो की, महाविकास
आघाडी पुढे सत्तेत येणार नाही, असा दावा सामंत यांनी केला.

 

तसेच कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी सरकार आमचेच येणार. त्यांच्याकडे नागनाथ-सापनाथ आहेत,
पण आमच्याकडे एकनाथ आहेत, त्यामुळे आमचेच सरकार येणार, असा दावा उदय सामंत यांनी केला.

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | uday samant reaction on vba prakash ambedkar statement on uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा