Maharashtra Politics News | ‘फडणवीसांची काहीतरी मजबूरी दिसतेय’, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरुन ठाकरे गटाचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्यात राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिंदे गट (Shinde Group) आणि विरोधात असणाऱ्या ठाकरे गटाकडून (Thackeray Group) वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत. भाजपकडून (BJP) यासंदर्भात शिंदे गटाची बाजू घेत सातत्याने भूमिका मंडली जात आहे. (Maharashtra Politics News) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) कायद्यानुसार निर्णय होईल असं सांगत आहेत. या सर्व गोंधळात पोपट मेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी (Maharashtra Politics News) बोलताना शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेच्या (MLA Disqualified) कारवाईबाबत भाष्य केलं होतं. मी यावर काहीही बोलू शकत नाही. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे असून ते एक अभ्यासक, एक वकील आणि 25 वर्षे विधानसभेत कार्य केलेले व्यक्ती आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पुरतं समजलं आहे की, पोपट मेला आहे. तरीही ते अशी गोष्ट बोलत आहेत. कारण सहाजिकच त्यांना कार्यकर्त्यांना दाखवावं लागणार की आशा जिवंत आहेत.

 

सरकारमध्ये एकच शहाणा माणूस बाकीचे…

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) मेलेल्या पोपटा विषयी भाष्य केलंय. पोपट मेलाच आहे. फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचंय. मला वाटलं होतं की सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी सगळे अतिशहाणे किंवा मूर्ख आहेत. फडणवीसच असं म्हणत असतील, तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील, असा टोला राऊतांनी लगावला.

 

त्यांची काहीतरी मजबुरी दिसतेय

संजय राऊत पुढे म्हणाले, फडणवीसांना विकीलीचं ज्ञान आहे, त्यांना कायदा कळतो.
त्यांना प्रशासन कळते. त्यांना राजकारण माहिती आहे. त्यांना पडद्यामागे काय चाललंय हे माहिती आहे.
ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत. तरी ते अशी विधानं करतायत म्हणजे त्याची काहीतरी मजबुरी दिसतेय.

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | uddhav thackeray mp sanjay raut mocks devendra fadnavis on supreme court order

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा