Maharashtra Politics News | ‘…तर कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल महाराष्ट्रात लागेल’, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचा मोठा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर राज्यात भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) सरकार सत्तेवर आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) पडले. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारविषयी तीव्र संताप आहे. (Maharashtra Politics News) आगामी काळात हे सरकार पाडण्यासाठी मविआकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री (NCP Former Minister) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक नामी शक्कल लढवली आहे. ते सोमवारी एका कार्यक्रमात बोलत होते.

 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी बोलून 50 हजार छोट्या पुस्तिका काढण्याचा विचार आहे. यामधून आपण सगळं सांगणार आहोत. पन्नास खोके आणि न्यायाविरोधात बनलेलं सरकार या दोन गोष्टी आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो तर कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल (Karnataka Election Results) महाराष्ट्रात लागेल. आपल्या 200 पेक्षा कमी जागा येणार नाहीत. म्हणून आपण सगळं करत आहोत, असं आव्हाड यांनी सांगितलं.

 

 

 

आगामी काळ हा निवडणुकांचा

कर्नाटकात काँग्रेसला यश मिळालं. हीच जादू आता इतर राज्यात चालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीकडून काँग्रेस मॉडेल (Congress Model) आणण्याची शक्यता आहे. राज्यात आधी लोकसभेच्या (Lok Sabha) आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) लागणार आहेत. आगामी काळा हा निवडणुकांचा असणार आहे, (Maharashtra Politics News) असे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच लहान-मोठ्या राजकीय पक्षांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

 

…त्यामुळे सगळ्याच नोटीस गैरलागू होतात

Advt.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन शिंदे गटावर निशाणा साधला होता.
शिवसेना शिंदे गटाने नवीन WHIP नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ मा. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)
त्यांचा भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या WHIP ला मान्यता देता येणार नाही हा दिलेला निकाल त्यांनी देखिल मान्य केलेला आहे.
त्यामुळे WHIP ने बजावलेल्या सगळ्याच नोटीस गैरलागू होतात. निकाल इतका स्पष्ट आहे.
WHIP शिवसेनेच्या सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांचाच लागू होणार हे आता शिंदे गटानेही मान्य केले आहे.

 

Web Title :  Maharashtra Politics News | Uddhav Thackeray Shinde Group Maha Vikas Aghadi Government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा