Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष’, माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | कर्नाटक निवडणुकीच्या (Karnataka Elections) निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) उत्साहाचे वातावरण आहे. भाजपला (BJP) रोखण्यासाठी मविआ मजबुतीने प्रयत्न करेल असे तिन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) जागावाटपावरुन मविआमधील नेते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) 20 जागांवर दावा केला आहे. तर काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादीने (NCP) समान जागा वाटप (Maharashtra Politics News) करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे. यातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 19 जागा कायम असल्याचे म्हटले आहे. मात्र, ठाकरे गटाकडे पाच खासदार असल्याचे सांगत राष्ट्रवादीने त्यांना फटकारले आहे. तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांनी शिवसेना (Shivsena) ठाकरे गट हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे म्हटले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीमध्ये सध्या राष्ट्रवादी मोठा भाऊ असल्याचे म्हटले आहे.
यावरुन मविआत लहान भाऊ आणि मोठा भाऊ यावरुन वाद समोर आला आहे.
अजित पवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने पलटवार (Maharashtra Politics News) केला आहे.
लहान-मोठे जाऊ द्या, राष्ट्रवादीचा जन्मच आमच्या उदरातून झाला असल्याचा टोला काँग्रेसने राष्ट्रावादीला लगावला आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गट हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेंट देत असतात यामध्ये काही गैर नाही.
आजच्या मविआच्या विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे.
काँग्रेस दोन तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.
त्यामुळे विधान करण्यामध्ये काही चुकीचं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, जागा वाटपामध्ये आत्तापर्यंत दोन ते तीन सूत्र वापरली जात होती. आत्तापर्यंत जे जे निकाल आहेत,
त्याचा विचार करुन जागा वाटपाचा निर्णय होईल. या घडीला भाजपला कोणता पक्ष पराभूत करेल यावर चर्चा करणे
आवश्यक आहे. त्यामुळे या स्टेटमेंटला फार काही विशेष अर्थ नाही.
जागा वाटपाकरता गंभीरतेने बसून एक सूत्र ठरवू, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
Web Title : Maharashtra Politics News | uddhav thackerays shivsena is the 3rd party the former congress chief minister prithviraj chavan spoke clearly
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा