Maharashtra Politics News | ‘गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ फडणवीसांवर आली’, ठाकरे गटाचा खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवडी-न्हावाशेवा सी लिंकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी (दि.24) पाहणी केली. या सी लिंकवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडी चालवण्याचा मोह आवरला नाही. यानंतर फडणवीस यांनी गाडीचं स्टेअरिंग हातात घेत गियर टाकला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या (Maharashtra Politics News) बाजूला बसले होते. यावरुन ठाकरे गटाने (Thackeray Group) देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. काय वेळ आली, गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली, असा खोचक टोला खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी लगावला आहे.

 

संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावं. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) कधी बेईमानांना मांडीवर घेतलं नव्हतं. गद्दारांना लाथा घालून हाकलून द्या असं सांगितलं होतं. पण देवेंद्र फडणवीस काल गद्दारांच्या गाड्या चालवत होते. (Maharashtra Politics News) काय त्यांच्यावर वेळ आली, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना फटकारले. तसेच शिवसेना (Shivsena) ही काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) गेल्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं, फडणवीसांना काहीही बोलू द्या. बाळासाहेबांनी कधीही व्यक्तींना विरोध केला नाही. काही भूमिकांना विरोध केला असेल. देवेंद्र फडणवीसांकडून बाळासाहेब शिकण्याची वाईट वेळ आमच्यावर अजून आलेली नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

 

उद्धव ठाकरेंना कोण नेतंय – फडणवीस

आमचा संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला (New Parliament Building Inauguration) विरोध असून मी संसद भवनात जाणार नाही,
असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले,
त्यांना कोण घेऊन जातंय, त्यांना जी जागा दिली होती, तिथेच ते जात नाहीत. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत, दोन तासांच्या वर तिथे बसत नाहीत,
त्यांना कोण लोकसभेत बोलवतंय? आणि कोण त्यांना संसदेत भवनात बोलावणार आहे? या सगळ्या लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाही.

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | what time has come for the devendra fadnavis
they drive the car of traitors sanjay rauts snarl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा