Maharashtra Politics News | राज्यात 11 मे नंतर नवं सरकार स्थापन होणार? राजकीय तज्ज्ञांचा दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडणार याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या एका ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चांना मोठं उधाण आलं आहे. कायदेतज्ञ असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी एक ट्विट करून मोठा दावा केला आहे. (Maharashtra Politics News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुध्दा नक्की असा दवा कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. (Maharashtra Politics News)

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठया प्रमाणावर नाराज आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईत वायबी चव्हाण सेंटरमध्ये घोषणाबाजी सुरूच ठेवली आहे. पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमधील सुसंवाद देखील चांगलाच वाढला आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या (Karnataka Assembly Election) रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी नुकताच मोठा गोप्यस्फोट केला आहे.

 

राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या यापुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Saha)
यांच्यासोबत बैठका झत्तल्या आहेत असा दावा चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान,
त्याच खंडण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे.
राज्यातील राजकीय परिस्थिती अशी असतानाच असीम सरोदे यांनी केलेल्या ट्विटनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
आगामी काही दिवसात राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळया चर्चांना सध्यातरी उधाण आले आहे.

 

Web Title :-  Maharashtra Politics News | Will a new government be formed in the state after May 11? Political experts claim

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच : मोबाईल कंपनीची फसवणूक करणार्‍या टोळीस गुन्हे शाखेकडून अटक

Maharashtra Registrars Office Open On Holiday | घर खरेदी-विक्री नोंदणी करणार्‍यांसाठी गुड न्यूज !
आता सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : येरवडा पोलिस स्टेशन – सहकारमंत्र्याचे सचिव असल्याचे सांगून
59 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

Chowk Marathi Movie Trailer Release | हिंदुस्थानी भाऊंच्या हस्ते दणक्यात बहुचर्चित मल्टिस्टारर ‘चौक’चा ट्रेलर लॉन्च;
देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ होणार 19 मे रोजी प्रदर्शित (Video)

Pune Cyber Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – Ather Energy ची डिलरशीप देण्याच्या नावाखाली 21 लाखाची फसवणूक