Maharashtra Politics News | ईडीची नोटीस राष्ट्रवादीच्या नेत्याला, जुंपली ठाकरे गट अन् शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये; 5 लाखांच्या बक्षिसाला 10 लाखांचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना काही दिवसांपूर्वी ईडीची (ED) नोटीस आली आहे. आयएल अँड एफएलएस प्रकरणी ( IL&FLS Case) ईडीने जयंत पाटलांना चौकशीसाठी बोलवले आहे. जयंत पाटील यांना इडीकडून नोटीस आल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप (Maharashtra Politics News) सुरु झाले आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांच्यात जुंपली आहे.

भाजपाच्या (BJP) एका तरी नेत्यावर ईडीची किंवा सीबीआयने (CBI) कारवाई केली असेल तर दाखवा मी 5 लाख रुपये देतो, असे संजय राऊत म्हणाले. याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Politics News) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राम मंदिरासाठी (Ram Mandir) संजय राऊतांना 10 लाख रुपये दिले होते, ते आधी परत करा आणि त्यानंतर ईडीच्या कारवाईवर बक्षीस द्या, असा टोला शिरसाट यांनी राऊतांना लगावला आहे.

 

कारवाई दाखवा 5 लाख देतो

भाजपच्या अनेक भ्रष्ट देश लुटणाऱ्या राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारनाम्यांच्या फाईल मी ईडीकडे पाठवल्या आहेत. सीबीआयकडे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पाठवल्या आहेत. एक लाख काय मी पाच लाख देतो, झालेली कारवाई दाखवा, असं राऊत यांनी म्हटलं होतं.

 

तुम्हाला घ्यायची भाषा कळते

संजय राऊत पाच लाख रुपये देत आहेत मला आश्चर्य वाटत आहे.
राम मंदिराच्या निर्माणासाठी एकनाथ शिंदे यांनी राऊतांना 10 लाख दिले होते.
ती उधारी आधी परत करा, द्यायची कुठे भाषा करता? तुम्हाला घ्यायची भाषा कळते. तुम्हाला पत्राचाळमध्ये घोटाळा
(Patra Chawl Scam) करता येतो. तुम्हाला इतरांना फसवून तिकीट द्यायची, यासाठी पैसे घेयचे. देण्याची दानत असावी लागते,
जी शिंदे मध्ये आहे. पाच लाख रुपये दिले तर त्यांना झोप येणार नाही. जो खातो,
त्याला द्यायची नाही तर घेयची सवय असते,
अशा शब्दात शिरसाट यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics News | will-give-award-of-five-lakhs-if-bjp-leaders-receives-
ed-notice-says-shivsena ubt mp sanjay-raut-mla-sanjay-shirsat-reacts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics News | ‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर…’, राज ठाकरेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर