Maharashtra Politics News | 16 आमदारांच्या अपात्रतेविरोधात संजय राऊतच पुरावा ठरणार?, अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाची काय असणार रणनिती?; मंत्री शंभूराज देसाई म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून 16 आमदारांच्या अपात्रतेचा (16 MLAs Disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्यास सांगितला आहे. त्यामुळे या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना (Maharashtra Politics News) अपात्रतेच्या कारवाईविरोधात शिंदे गटाची (Shinde Group) रणनिती काय असेल याची माहिती मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. याचबरोबर मुंबई महापालिकेवर (Bruhan Mumbai Corporation (BMC) महापौर युतीचा बसेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे. तसेच शिवसेनेचा वर्धापन दिन (Shivsena Vardhapan Din) हा शिंदे गटच साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार टप्पा दोन ही योजना (Jalyukta Shiwar Yojana) मागच्या सरकारने थांबवल्याने शेतीचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले आहे. याचाच आढावा आम्ही काल घेतला यात मुख्यमंत्री व्हिसीद्वारे सहभागी झाले होते.
गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार हे आजपासून राबवणार आहोत. हा गाळ गायरान व पडीक जमिनींवर टाकला
जाणार आहे. यामुळे जमिन सुपिक होईल आणि जलसाठे 100 टक्के भरतील असे नियोजन असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

देसाई पुढे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेच्या अर्जावर विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) आमदारांना
नोटीस बजावणार आहेत. त्याला आम्ही आम्हाला झालेल्या त्रासाची कैफियत लेखी मांडणार आहोत.
संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमच्याविरोधात जी काही (Maharashtra Politics News) वक्तव्ये केली आहेत,
त्याचे पुरावे आम्ही जोडणार आहोत. राऊतांविरोधात हक्कभंगाबाबत आम्ही सुमोटो घेऊन कारवाई करण्याची
मागणी करणार आहोत, असे देसाई यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे त्याची खंत राज्यपालांकडे व्यक्त करत असतील.
जे त्यांना जमले नाही ते आता आम्ही करत आहोत. मुंबईचा विकास त्यांना बघवत नसेल.
त्यांना जो आक्षेप असेल तो त्यांनी लेखी मुख्यमंत्र्यांना द्यावे. संजय राऊत हे विश्वप्रवक्ते असून जगाच्या
पाठीवर कुठेही काहीही घडले की ते नाक खुपसतात, असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला.

Web Title :  Maharashtra Politics News | will sanjay raut be the proof against the disqualification of 16 mlas in vidhansabha by eknath shinde group the speaker of the legislative assembly will issue notice to shinde shambhuraj desai hints on politics shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंचा फोटो स्टॅम्पसाईज…’, देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका; म्हणाले- ‘जे खरे बाळासाहेबांचे पाईक होते ते…’ (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात; तरुणासह तिघांवर अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल