Maharashtra Politics | महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात (Winter Session) राजकारण चांगलंच तापलं आहे. आता महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव (Maharashtra Politics) आणला आहे. यासंदर्भात मविआ कडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत (Assembly Secretary Rajendra Bhagwat) यांना पत्र देण्यात आले आहे. काँग्रेसचे सुनील केदार (Congress Sunil Kedar), शिवसेनेचे सुनील प्रभू (Shiv Sena Sunil Prabhu), सुरेश वरपुडकर (Suresh Varpudkar), अनिल पाटील (Anil Patil) यांनी हे पत्र सचिवांना दिले आहे.

 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विविध मुद्यांवर सभागृहात ज्यावेळी चर्चा सुरु असते त्यावेळी विरोधकांना बोलू देत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये यासंदर्भात नाराजी होती. आज देखील शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचं पत्र देण्यासंदर्भात काही दिवसांपासून संकेत दिले होते. (Maharashtra Politics)

 

हिवाळी अधिवेशात विरोधी पक्षातील आमदारांना अध्यक्ष बोलू देत नसल्याने नाराजी वाढली होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर (Maharashtra Karnataka Borderism) काही सदस्यांनी बोलू देण्याची विनंती केली होती. मात्र अध्यक्षांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी वाढू लागली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाचं पत्र देण्यात आले आहे.

 

सुनील केदार, सनील प्रभू, सुरेश वरपुडकर आणि अनिल पाटील यांनी अविश्वास प्रस्तावाचं पत्र सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे दिले.
राजेंद्र भागवत मविआ आमदारांच्या पत्रावर निर्णय घेणार आहेत. महाविकास आघाडीकडून 39 पेक्षा अधिक आमदारांनी सह्या केल्याची माहिती आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | no confidence motion against assembly speaker rahul narvekar by maha vikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

Ajit Pawar | ‘मी बिलंदर शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही, पण…’ अजित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला

MLA Sunil Tingre | नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन वाहतुक कोंडी सोडवा; आमदार सुनिल टिंगरे यांची लक्षवेधीतून विधानसभेत मागणी