Maharashtra Politics | पंकाज मुंडेंची नाराजी दूर होणार? दिल्लीत घडामोडींना वेग; देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल

0
486
Maharashtra Politics | pankaja munde entry in the meeting of eknath shinde devendra fadnavis and amit shah in delhi
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच पंकजा मुंडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली होती. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचदरम्यान आज दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. या बैठकीला पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) सुद्धा हजर राहणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर होणार का? हे पहावे लागेल. (Maharashtra Politics)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. राज्यातील विकास कामांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Politics)

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह पंकजा मुंडे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आज दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे
(Raosaheb Danve), राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil),
खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) उपस्थित असणार आहेत.
या बैठकीमध्ये राज्यातील नवीन सरकार कायदा, मल्टी स्टेट बँक आणि कारखान्यासंदर्भात नवीन कायदा,
फळ प्रक्रिया उद्योग, इथेनॉल धोरण, आजारी कारखाने या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title :- Maharashtra Politics | pankaja munde entry in the meeting of eknath shinde devendra fadnavis and amit shah in delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

BJP MLA Ashish Shelar | ‘आजही शेठजी उद्धव ठाकरेंचं लक्ष ठेकेदारांचे पैसे परत देण्यावर’, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?