Maharashtra Politics | परभणीत शिंदे गट राष्ट्रवादीला सुरूंग लावण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीचा मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

0
310
Maharashtra Politics | parbhani ncp mla babajani durrani will join the shinde group
file photo

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर सेनेचे दोन्ही गट जोरदार पक्षबांधणी करताना दिसत आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील नेत्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shivsena) पक्षात प्रवेश झाला. त्यातच आता परभणी जिल्ह्यातील शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या (Shinde Group) वाटेवर असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics)

नुकतच परभणी जिल्ह्यातील ४० सरपंचांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे परभणीचे नेते सईद खान यांनी बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच त्यांच्यासोबतच इतरही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिंदे गटात येण्यास उत्सुक आहेत. असा देखील दावा यावेळी बोलताना सईद खान यांनी केला. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता सईद खान यांनी हा मोठा खुलासा केल्याने परभणीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. (Maharashtra Politics)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातल्या एवढ्या मोठ्या नेत्याबाबत सईद यांनी हे विधान केल्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, यावर आपण शरद पवार यांचे समर्थक असून कायम त्यांच्याकडेच राहणार असा दावा बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी सईद खान यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
त्यानंतर त्यांनी परभणी जिल्ह्यात शिंदे गटात चांगलीच इनकमिंग सुरू झाली असून यात आणखी वाढ होणार आहे
असा दावा देखील यावेळी बोलताना सईद खान यांनी केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सईद खान यांनी बाबाजानी दुर्राणी यांच्यावर घोटाळ्याचा
आरोप केला होता. त्यातच त्यांनी बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. हे खळबळजनक वक्तव्य
केल्याने याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Web Title :- Maharashtra Politics | parbhani ncp mla babajani durrani will join the shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘राष्ट्रवादीची ‘ही’ खेळी सेनेवर दबाव टाकण्यासाठी होती का?’, शिंदे गटाच्या नेत्याचा परखड सवाल

Pune Crime News | बंगला विकत घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रे केली तयार; दुसर्‍याने बंगल्यावर घेतले सव्वा दोन कोटींचे कर्ज, ७५ वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

Jayant Patil | अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटील यांचे खळबळजनक विधान; म्हणाले…