Maharashtra Politics | डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत शिंदे आणि ठाकरे दोघांचेही फोटो

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदारांच्या तर वाटण्या झाल्या पण शाखा आणि कार्यालये राहिली आहेत. शाखा कोणत्या गटाच्या, यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात वादंग सुरु आहेत. डोंबिवलीच्या शाखेवर देखील गुरुवारी असेच वाद पेटले होते. ठाण्यातील बहुतांश शिवसैनिक शिंदे यांच्या गटात आहेत, त्यामुळे त्या शाखेवर शिंदे गटाने दावा केला आहे. मात्र, आता या शाखेत शिवसेनेच्या दोनही गटांच्या नेत्यांचे फोटो पहायला मिळाले आहेत. या शाखेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे फोटो टांगले आहेत. (Maharashtra Politics)

त्यामुळे ही शाखा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. जून महिन्यात शिवसेनेत वाद होऊन शिवसेना फुटल्यावर या शाखेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांचे फोटो ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले होते. तेव्हा वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर भाऊबीजच्या नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शिंदे यांच्या गटातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर शाखेवर जात शाखेचा ताबा घेतला. तसेच यावेळी त्यांनी या शाखेच्या जागेचा व्यवहार करुन शाखेची जागा शिंदे गटाच्या नावावर करुन देखील घेतली. त्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला होता. (Maharashtra Politics)

शिंदे यांच्या गटातील लोकांनी मुख्यमंत्री एकनाख शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो परत खुंटीला टांगले
आहेत. दोनही गटातील वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी दोघांना वेगवेगळी कार्यालये दिली आहेत. त्यानंतर हा वाद काही काळ थांबला. परंतु शिंदे गटातील लोकांनी शाखेचा करारनामा करुन जागा आपल्या ताब्यात घेतल्याने पुन्हा नवा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे आगामी काळात या शाखेवर कोणाचे वर्चस्व राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- Maharashtra Politics | photo of shinde and thackeray in dombivli shivsena branch is discussed everywhere

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा रवी राणांना संतप्त सवाल, मग मला कुणी पैसे दिले? एकनाथ शिंदेंनी की देवेंद्र फडणवीसांनी?

Winter Health Tips | सर्दी-तापापासून करायचा असेल बचाव तर आहारात करा ‘या’ 5 गोष्टींचा समावेश