Maharashtra Politics | शिरूर तालुक्यात भाजपची मोठी खेळी; राष्ट्रवादीला शह देण्यासाठी फडणवीसांचा शिलेदार मैदानात?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | पुणे जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समीकरण गेली कित्येक वर्षे चालत आले आहे. पुणे जिल्ह्यात बारामती, शिरूर, जुन्नर, मावळ, आंबेगाव, इंदापूर आदी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुणे जिल्ह्यात हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. भाजपचे लक्ष पुणे जिल्हा आहे. त्यामुळे वरील बहुतांश भागांत भाजप राष्ट्रवादीला आव्हान देणार आहे. शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या ठिकाणी भाजपचे दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांना तुल्यबळ असा विरोधक राहिलेला नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस (Maharashtra Politics) यांचा निकटवर्तीय सहकारी पवार यांच्या विरोधात उभा करण्याची भाजप तयारी करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्रदीप कंद पेरणे – वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करतात. त्या ठिकाणातून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. त्यामुळे जर भाजपकडून प्रदीप कंद यांनी उमेदवारी दिली, तर भाजपकडून शिरूरसाठी पूर्ण ताकत लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजप शिरूर तालुक्यातून प्रदीप कंद यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सध्या तरी भाजपकडून (Maharashtra Politics) त्यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती आहे.

प्रदीप कंद मूळ राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. प्रदीप कंद यांना 2014 साली विधानसभेच्या उमेदवारीची अपेक्षा होती.
तसा अजित पवार यांनी त्यांना शब्द दिला असे ते सांगतात. मात्र अशोक पवार यांना उमेदवारी दिली गेली
आणि त्यांना थांबविण्यात आले. 2019 साली त्यांना शिरूर लोकसभेचा प्रस्ताव देण्यात आला होता.
पण त्यांनी तो नाकारला. 2019 ला देखील अशोक पवार यांना विधानसभेसाठी तिकीट दिल्याने कंद नाराज झाले.
त्यांनी निवडणुकीपूर्वी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला.
मात्र भाजपने बाबुराव पाचर्णे यांना उमेदवारी दिली आणि कंद तिकडे देखील उपेक्षित राहिले.
आता बाबुराव पाचर्णे यांचे देहावसान झाल्याने भाजपकडे कंद यांच्या शिवाय कोणता पर्याय नाही.
त्यामुळे त्यांच्या नावाच्या शिरूर भाजपमध्ये चर्चा आहेत.

Web Title :- Maharashtra Politics | pradeep kand is likely to be given a chance as a candidate by bjp from shirur constituency in the 2024 assembly elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shinde – Fadnavis Government | शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट नुकसान भरपाईची मदत जाहीर

Pune News | ‘बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा’ – चंद्रकांत पाटील