Maharashtra Politics | प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड अडीच तास चर्चा, प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाला धक्का देणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | एकीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा पक्ष ठाकरे गटासोबत (Thackeray Group) युती (Alliance) करणार असल्याची चर्चा सुरु असून दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून युतीचे संकेत मिळत आहेत. मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यामध्ये बुधवारी बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजगृहावर जाऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली याचा खुलासा करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रकाश आंबेडकर यांच्यात बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी (Maharashtra Politics) बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, यावेळी नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याची माहिती समजू शकली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत जाऊन ठाकरे गटाला धक्का देणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

या भेटीसंदर्भात वंचित बहुजन आघाडी आणि शिंदे गटाकडून दुजोरा देण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत इंदू मिल (Indu Mill) संदर्भात चर्चा झाली.
याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे
(Spokesperson Siddharth Mokale) यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.
तसेच या बैठकीला गुप्त बैठक म्हणता येणार नाही कारण ही बैठक वर्षा या शासकिय निवासस्थानी झाली असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी दिली.
सर्व पक्षांना घेऊन महाराष्ट्राचा विकास करावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण असल्याचे देखील म्हस्के यांनी सांगितले.

Web Title :- Maharashtra Politics | prakash ambedkar cm eknath shinde meeting at varsha bunglow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

DGP Rajnish Seth | ‘कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक’; पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

Amol Mitkari | अमोल मिटकरींची खासदार किरीट सोमय्यांवर बोचरी टीका; म्हणाले…

Yerwada Jail Exhibition | कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’वर, कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची माहिती