Maharashtra Politics | शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश, फेरविचार करावा’; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मत

मुंबई : Maharashtra Politics | शिवसेनेबाबत (Shivsena) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयामुळे चुकीचा संदेश गेला असून, घटनापीठाने याचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबत शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने शिवसेनाला मोठा धक्का देत शिंदे गटाला (Shinde Group) काल मोठा दिलासा दिला. (Maharashtra Politics)

निवडणूक आयोगाला (Election Commission) सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत पुढील कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयावर आता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट मत नोंदवले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे संविधान आणि संसदेने आतापर्यंत राखून ठेवलेला निवडणूक आयोगाचा तटस्थपणा नष्ट झाला आहे. शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा बंधनकारक आहे, पण त्याचा आदर होईल किंवा नाही, याबाबत मला शंका आहे.
संविधानाने आणि संसदेने ही दक्षता घेतली पाहिजे की, निवडणूक आयोग कुठेही पक्षपाती होणार नाही.
निवडणूक आयोगावर कुठेही शिंतोडे उडणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. (Maharashtra Politics)

प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणूक आयोगाने स्वत:च्याच अधिकाराचा वापर करत पक्षचिन्हाबाबत 1968 सालचा कायदा तयार केला होता. या कायद्यातील कलम 15 वादग्रस्त आहे.
त्यानुसार एखाद्या पक्षात चिन्हाबाबत वाद झाला तर निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करण्याचे अधिकार प्राप्त झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाला पहिल्यांदाच ही संधी चालून आली होती की, कलम 15 हे संवैधानिक आहे किंवा नाही,
याची तपासणी करता आली असती. परंतु, दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने ती तपासणी केली नाही.

आंबेडकर पुढे म्हणाले की, आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय आणि संसदेने राखून ठेवलेली निवडणूक आयोगाची तटस्थता या निर्णयामुळे नष्ट झाली आहे.
आगामी काळात पक्षचिन्हाचा निर्णय हा निवडणूक आयोगच घेईल, असा चुकीचा संदेश जाऊ शकतो.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचे पुनवरालोकन करणे गरजेचे आहे.

Web Title :- Maharashtra Politics | prakash ambedkar reaction over shivsena party symbol supreme court decision on eknath shinde group election commission

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Rupani | भाजपा हायकमांडच्या फोनबाबत विजय रुपानी यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले – रात्री फोन आला आणि सकाळी….

Ekta Kapoor Arrest Warrant | सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह ट्रिपल एक्स वेबसिरीज प्रकरणी एकता कपूरविरोधात अटक वॉरंट

7th Pay Commission DA | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठे ‘फेस्टिव्हल गिफ्ट’, महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ