Maharashtra Politics | राजापूर रिफायनरीवरुन शिवसेनेत वाद, आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राजापूर रिफायनरीवरुन (Rajapur Refinery) शिवसेनेमध्ये धूमशान सुरु आहे. बारसू, सोलगाव याठिकाणी रिफायनरी उभारणीला स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी (Shivsena MLA Rajan Salvi) यांनी समर्थन केले. यामुळे शिवसेनेचे नेतृत्व साळवी यांच्या निर्णयावर नाराज (Maharashtra Politics) आहे. स्थानिक जनतेच्या बाजूने शिवसेना असल्याची खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांची भूमिका आहे. राजन साळवी यांनी घेतलेल्या समर्थनाच्या भूमिकेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

राजापूर रिफायनरीच्या समर्थनार्थ राजन साळवी यांनी भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर (Matoshree) बोलावून घेत खडसावल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षश्रेष्ठींनी रिफायनरीला विरोध केल्यास आमदार राजन साळवी वेगळी राजकीय भूमिका घेण्याची शक्यता आहे. राजन साळवींचं रिफायनरीला समर्थन हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याची भूमिका शिवसेना नेत्यांची (Maharashtra Politics) आहे. मात्र भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवसेना नेतेपद दिल्यामुळे साळवी नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

नाणारमध्ये होत असलेल्या रिफायनरीला शिवसेनेचा प्रचंड विरोध केला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री (CM) झाल्यानंतर केंद्र सरकारला (Central Government) नाणार ऐवजी राजापूरच्या बारसू, सेलगावम येथे जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात (Konkan) तीन आमदार शिल्लक आहेत.
यामध्ये राजन साळवी, वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे.
जर राजन साळवी यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला तर शिवसेनेचे केवळ दोनच आमदार कोकणात शिल्लक राहतील.
दरम्यान पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु झाल्यानंतर साळवी शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती.
मात्र साळवी यांनी हे वृत्त फेटाळून लावत आपण मातोश्रीसोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

 

Web Title :- Maharashtra Politics | rajapur refinery uddhav thackeray unhappy with shivsena mla rajan salvi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या संस्थेतील 10 ते 12 लाभार्थी, अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

 

Pune Crime | पुण्यातील एमजी रोडवर होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची प्रकृती बिघडली, ससून रुग्णालयात दाखल