Maharashtra Politics | महायुतीत फूट?, महादेव जानकर यांचा मोठा निर्णय, म्हणाले-‘भाजपची इच्छा नसेल तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला (Assembly Elections-2024) बराच कालावधी आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीमध्ये फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांकडून (Maharashtra Politics) आक्रमक प्रतिक्रिया आल्या. तसेच भाजपचा (BJP)विश्वासू मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

 

लोकसभेच्या जागा लढवणार
महादेव जानकर म्हणाले, भाजपने जागा वाटप जाहीर केले, त्यामध्ये आमचा विचार करण्यात आलेला नाही. शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार (Maharashtra Politics) असल्याचे पाहायला मिळत आहे. आम्हाला सोबत घेण्याची भाजपची इच्छा नसेल, तर आम्हीही देखील मागे लागणार नाही. आमच्या ताकदीवर 48 लोकसभेच्या जागा लढवण्याची आमची तयारी आहे. सोबत घेतले तर ठिक अन्यथा स्वबळावर लढू, अशी स्पष्ट भूमिका जानकर यांनी मांडली.

भाजपला आमची गरज वाटत नसेल तर…
जानकर पुढे म्हणाले, आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे. सध्या आपले दोन आमदार आहेत. मी वरच्या सभागृहात आहे तर एकजण खालच्या सभागृहात आहे. आमच्याकडे 98 जिल्हा परिषदा, तीन सभापती आहेत. आसाम आणि कर्नाटकमध्ये एक-एक जिल्हा परिषद सदस्य आहे. गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात पक्षाला टेक्निकली मान्यता मिळाली आहे. असे असताना जर भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, असे जानकर यांनी सांगितले.

 

अन्यथा आमचा रस्ता मोकळा
आम्ही लोकसभेच्या पाच जागांची मागणी भाजपकडे केली आहे. ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्याच जागांची मागणी आम्ही केली आहे.
जर तो प्रस्ताव भाजपला मान्य नसेल आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आघाडी करण्याचे ठरवले असेल,
तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आमचा पक्ष भाजपवर अवलंबून नाही.
त्यांना गरज वाटली तर ते आम्हाला सोबत घेतील. अन्यथा आमचा रस्ता मोकळा आहे, असंही जानकर यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Politics | rashtriy samaj paksh mahadev jankar on chadrashekhar bwankule statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | राष्ट्रवादी-काँग्रेससोबतची आघाडी तोडा, आजही तुमचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार – दीपक केसरकर

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले