Maharashtra Politics | पुण्यातील काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना पुण्यात देखील मोठी राजकीय घडामोड होताना पहायला मिळत आहे. टिळक स्मारक ट्रस्ट (Tilak Smarak Trust) कडून दरवर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्कार (Lokmanya Tilak National Honor Award) दिला जातो. दरवर्षी या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते (Congress Leader) आणि पदाधिकारी असतात. परंतु यावर्षी या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांना आमंत्रित करण्यात आले असून ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. यावरुन पुण्याच्या राजकारणात रोहित टिळक (Rohit Tilak) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळात रंगू लागली आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहित टिळक यांनी त्यांचा प्रदेश कार्यकारिणी पदाचा राजीनामा (Resignation) दिला होता. काँग्रेस पक्षात एकाच व्यक्तीकडे दहा वर्षापेक्षा अधिक काळ पद नको असे धोरण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार रोहित टिळक यांनी राजीनामा दिला आहे. (Maharashtra Politics)

 

काँग्रेस कार्यकारिणी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित टिळक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
त्यानंतर आता घरच्या कार्यक्रमाला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.
त्यामुळे या चर्चांना पुष्टी मिळत आहे.

 

Web Title : – Maharashtra Politics | rohit tilak may be way towards bjp chandrakant patil pune political news politics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा