Maharashtra Politics | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या आमदाराचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘शपथविधीबाबत संजय राऊतांना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधी बाबत (Swearing in) गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde Group MLA Sanjay Shirsat) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) आरोप करताना नवा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊतांनाही कल्पना होती असा दावा (Maharashtra Politics) शिरसाट यांनी केला आहे.

 

उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींना…
पहाटेच्या शपथ विधीची माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांच्याप्रमाणे संजय राऊतांना देखील होती याबाबत ठाकरे कुटुंबातील कोणाला माहिती होती का? या प्रश्नावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले, याबाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी वहिनी (Rashmi Thackeray) यांना माहिती होती. मात्र परिस्थितीमुळे काहीही बोलता आले नव्हते. परंतु त्यावेळी जे काही घडलं ते सर्व काही आता सांगू शकत नाही, पण संजय राऊत यांना चांगलाच प्रसाद दिला होता आणि तो प्रसाद राऊत यांना चांगला माहित आहे. आता पश्चाताप करण्याची वेळ गेली असून, तेही पुढे गेले आणि आम्ही देखील पुढे गेलो असल्याचे संजय शिरसाट म्हणाले. (Maharashtra Politics)

 

संजय राऊत सायको
राऊत हा साधासुधा माणूस नाही. हे सत्तांतर झाले ते सहजासहजी झाले नाही. संजय राऊत हे सायको आहेत. हा कधी काय बोलेल आणि कधी कुणाला अडचणीत आणेल हे सांगता येत नाही. उद्धव ठाकरे या सायकोपणामुळेच अडचणीत आल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

संजय राऊतांच्या पडद्यामागून हालचाली
ज्यावेळी 2019 मध्ये सत्तांतर होणार होते, मातोश्रीवर बैठक, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलेल्या सूचना हे सर्वकाही सुरु होते. त्यावेळी संजय राऊत हे पडद्यामागून वेगळ्या हालचाली करत होते. शरद पवार आणि संजय राऊत यांचे घट्ट नाते आहे हे सर्वांना माहिती आहे.

 

इच्छा नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले
संजय शिरसाट पुढे म्हणाले, आम्ही सगळे हॉटेलमध्ये असताना टीव्हीवर बघितले की शपथविधी सोहळा झाला.
यानंतर ज्या घडामोडी घडल्यात त्यात एक ट्विस्ट आला.
आता जर हे थांबवायचे असेल तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न करता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री कराव लागेल हे ट्विस्ट झाले.
त्याच ठिकाणी गेमचेंजर झाला. उद्धव ठाकरेंना इच्छा नसताना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली.

 

Web Title :- Maharashtra Politics | sanjay raut also knew about the early morning swearing in claims eknath shinde mla sanjay shirsat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना