संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला, म्हणाले – ‘अरे बापरे… मला भीती वाटतेय त्यांची’

पोलीसनामा ऑनलाईन – ”अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटतय आहे, ते पत्र लिहतायेत.. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत ते वाचत नव्हते. असच सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीच सरकार राहणार आहे, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil) यांना लगावला आहे.

सामनातून होणाऱ्या लिखाणाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आक्षेप नोंदवला होता. सामनातून गलिच्छ भाषा वापरली जाते. याबद्दल आपण संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच ते सामना वाचत राहिले तर आगामी 5 वर्ष राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार राहणार आहे, यावर पाटलांचा विश्वास बसेल असा टोला लगावला आहे.

.. आता फक्त कागदावर बदलायचे आहेः खा. राऊत
औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येताना दिसत आहे. या मुद्यावरून भाजपाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. या औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी केल होते. त्याला 30 वर्ष झाली आहेत. आता फक्त कागदावर बदलायचे आहे. महाविकास आघाडीत हा मतभेदाचा विषय नाही. एकत्र बसले, तर मुद्दा निकाली निघेल, असे खा. राऊत यांनी सांगितले.