Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | भाजप जर १४५ जागा लढवणार तर शिंदे गट काहीच जागा लढवणार नाही का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला होता. आज (दि. ३ जानेवारी) रोजी जळगाव येथे बोलताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर आरोप केले आहेत. यात त्यांनी संजय राऊत हे भाजप आणि शिंदे गट यांच्यात भांडण लावत असल्याबाबत त्यांनी एक वक्तव्य केले आहे. (Maharashtra Politics)

जळगाव येथे आयोजीत एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. भाजपकडून आता मिशन लोकसभा राबवण्यात येत आहे त्यावर शिंदे गटाची भूमिका काय? असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले युतीच्या आमच्या नेत्यांवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे ते जे निर्णय देतील ते आम्हाला मान्य राहील, मात्र त्याबाबत शिंदे साहेबांनी आम्हाला सांगायला हवे, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना टोला लगावला.

दरम्यान मंत्रीमंडळ विस्तारावर बोलताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की,
याबाबत अधिक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सांगु शकतात. तसेच शिंदे गटातील अंतर्गत धुसफूसी बद्दल बोलताना ते म्हणाले, मागच्या सरकारमध्ये देखील ही धूसफूस होती आणि ती झाल्यामुळेच आम्ही गुवाहटीला गेलो.
एकनाथ खडसे यांच्या परिवाराच्या शेतामधून अवैध गौण खनिज उपसा झाल्याच्या तक्रारी नंतर तातडीने खनिज कर्म विभागाचे पथक काल जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर येथे दाखल झाले आहे. खडसेंवरील ही कारवाई केवळ राजकीय आकसापोटी ही केली जात असल्याचा बाबत चर्चा होत असताना मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मात्र या कारवाईचे समर्थन केले आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील हे प्रकरण विधान सभेत मांडले गेले होते.
त्या ठिकाणी चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर देखील करण्यात आले होते.
त्यामुळे विधान सभेत दिलेले आश्वासन हे सर्वोच्च असल्याने त्यावर लवकर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे
ही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. मुक्ताईनगरमध्ये गौण खनिज घोटाळ्यात जवळपास ४०० कोटींचा
महसुल बुडवल्याचा आरोप एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर करण्यात आले होते.
त्यावर या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी दिले होते.

Web Title :-  Maharashtra Politics | sanjay raut creating fight between bjp shinde sena says gulabrao patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahavitaran Strike | संपाच्या 72 तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास ; पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा राहणार

Maharashtra Politics | मोदींनी नारायण राणेंना चांगलेच खडसावले; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

MP Amol Kolhe | छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’?, खा. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडीओ)